मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाऊ, भावजयी जीवावर उठले, नायब तहसिलदाराला भर रस्त्यात आडवून अंगावर पेट्रोल टाकलं अन्..; बीडमधील धक्कादायक घटना

भाऊ, भावजयी जीवावर उठले, नायब तहसिलदाराला भर रस्त्यात आडवून अंगावर पेट्रोल टाकलं अन्..; बीडमधील धक्कादायक घटना

बीड जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला नायब तहसीलदाराला भर रस्त्यात आडवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India
  • Published by:  Ajay Deshpande

बीड, 21 जानेवारी :  बीड जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला नायब तहसीलदाराला भर रस्त्यात आडवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आशा वाघ असं या नायब तहसीलदार महिलेचं नाव आहे. यापूर्वी देखील तहसील कार्यालयात त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.

अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हक्कसोड प्रमाणपत्रावर सही करत नसल्यानं सख्खा भाऊ आणि भावजयीच नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या जीवावर उठले आहेत. आशा वाघ या  बीड जिल्ह्यातील केज तहसिल कार्यालयात सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या भावजयीनं त्यांना भर रस्त्यात अडवले त्यानंतर त्यांचा गळा आवळून त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिंवत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या घटनास्थळावरून पळाल्यानं थोडक्यात बचावल्या आहेत. सध्या त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भावाचा कोयत्यानं हल्ला 

दरम्यान सहा महिन्यापूर्वी सख्ख्या भावानेच आशा वाघ यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या, या प्रकरणात त्यांचा भाऊ मधुकर वाघ याच्याविरोधात गुन्हा दाखल असून, तो सध्या जिल्हा कारागृहात आहे.

First published:

Tags: Beed, Beed news, Crime, Crime news, Police