'या' कारणांमुळे अस्वस्थ आहेत पंकजा मुंडे

'या' कारणांमुळे अस्वस्थ आहेत पंकजा मुंडे

मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे अस्वस्थ असल्यानं भाजपच्या गोटात चिंता निर्माण झालीय.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड 02 डिसेंबर : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. विधानसभेच्या निकालानंतर त्यांच्या अस्वस्थेत भर पडलीय. परळीत त्यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. सर्व राज्यात लक्षवेधी ठरलेली ही लढत गाजलीही होती. मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असा दावा करणाऱ्या पंकजा मुंडे यांना या पराभवामुळे मोठा धक्का बसला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला हा मोठा धक्का मानला जातो. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून त्या अस्वस्थ असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे मला तुमच्याशी बोलायचं आहे असं सांगत त्यांनी फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. अंतर्गत राजकारण आणि पक्षात कमी होत जाणारं महत्त्व यामुळे पंकजा मुंडे या नाराज आहे असं त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगितलं जातंय.

40 हजार कोटींसाठी शपथविधी? भाजप खासदाराच्या दाव्यानंतर फडणवीसांनी केला खुलासा

सुरूवातीच्या काळात पंकजा मुंडे यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली होती. त्याची चर्चाची अनेकदा झाली. त्यातूनच देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात शीतयुद्धाला सुरुवात झाल्याचं बोललं जातंय. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी चिक्की प्रकरणात अनेक आरोप केलेत. त्या आरोपांना भाजपमधल्याचं काही लोकांनी खतपाणी पुरवलं असं त्यांना वाटतं होतं. त्यानंतर त्यांच्यात आणि फडणवीसांमध्ये फारसं सख्य राहिलं नाही असं बोललं जातंय. विधानसभेतल्या पराभवाला भाजपमधल्याच काही लोकांनी बळ पुरवलं.

महाविकास आघाडीच्या कामाला सुरुवात, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी

त्यात मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे असं पंकजा मुंडे यांना वाटतं. आपले पंख छाटण्यासाठीच आपल्या विरोधकांना रसद पुरवली गेली असंही त्यांचं मत आहे. त्यातच देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांच्या मदतीने अजित पवारांशी संधान साधलं याची चर्चा आहे. त्यामुळेही पंकजा मुंडे या नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे खास पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं होतं.

'घर फिरले की घराचे वासेही फिरतात'; भाजपची सत्ता गेल्याने 15 आमदार करणार घरवापसी!

जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडे आणि पंकजामध्ये विस्तव जात नाही. त्या पार्श्वभूमीवर पक्षात दबाव निर्माण करण्यासाठी पंकजा मुंडे यांची ही खेळी असल्याचंही बोललं जातंय. पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे त्यांना आता विधान परिषदेवर यायचं आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. किंवा मोठी जबाबदारी मिळावी असं त्यांना वाटतं. त्यामुळे 12 डिसेंबरला त्या कुठली घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 03:20 PM IST

ताज्या बातम्या