मुंबई, 31 डिसेंबर : सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या जल्लोषात (new year celebration 2022) स्वागत करण्यात येत आहे. पण, या नव्यावर्षात पुन्हा एकदा कोरोनाचे (corona) संकट समोर येऊन उभे ठाकले आहे. आधीच राज्यात नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून राज्यात तिसरी लाट धडकली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिली. तसंच, राज्यात आला लॉकडाऊन लावल्याशिवाय पर्याय नाही, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. आज सुद्धा राज्यात 8 हजार रुग्ण आढळले आहे. टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना विजय वडेट्टीवार यांनी वाढत्या रुग्ण संख्येबद्दल चिंता व्यक्त केली.
राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे लोक बेफिकीर झाले आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुटवले जात आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. अशीच जर रुग्ण संख्या वाढत गेली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं स्पष्ट मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.
(Motilal Oswalच्या BUY रेटिंगमुळे Indigo Paints च्या शेअरमध्ये 15 टक्क्यांची उसळी)
तसंच, जानेवारी आणि एप्रिल महिन्यामध्ये राज्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची स्थिती आहे. त्यामुळे लोकांनी आता कोरोनाचे नियम पाळावे. लोकांनी जर नियम पायदळी तुटवले तर लॉकडाऊन शिवाय राज्यात पर्याय नाही, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट (Maharashtra Corona Third Wave) धडकली आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पण आज या रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. कारण राज्यात आज दिवसभरात 8 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
(पनवेलमध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या फार्महाऊस असलेल्या भागात MD Drugsचा कारखाना)
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai Corona), पुणे (Pune Corona), नागपूर (Nagpur Corona) यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा फोफावताना दिसतोय. नागपुरात तर आज 80 पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यातही हाच आकडा 400 च्या पुढे गेला आहे. तसेच मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट गतीने वाढतोय. मुंबईत आज तब्बल 5 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत.
महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये कोरोना वाढला, मुंबईत प्रचंड वाढ
महाराष्ट्रातील मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 8,067 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबई शहरातच 5428 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. मुंबईतील कोरानाबाधितांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे मुंबईत काल 3671 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज थेट हाच आकडा 5428 वर पोहोचला आहे. राज्यात दिवसभरात 1,766 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.