मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Panvel मध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटींचे फार्महाऊस असलेल्या परिसरात MD Drugsचा कारखाना, पोलिसांकडून खेळ खल्लास !

Panvel मध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटींचे फार्महाऊस असलेल्या परिसरात MD Drugsचा कारखाना, पोलिसांकडून खेळ खल्लास !

वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली

वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली

MD Drugs factory seized in Panvel : नवी मुंबईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पनवेलच्या नेरे भागात एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.

मुंबई, 31 डिसेंबर : नवी मुंबईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पनवेलच्या नेरे भागात एमडी ड्रग्ज (MD Drugs) तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. विशेष म्हणजे ज्या भागात हा कारखाना होता त्या भागात अनेक सेलिब्रिटी (celebrity) आणि धनाढ्य लोकांचे फार्महाऊस (Farnhouse) आहेत. पोलिसांना या कारवाईत तब्बल अडीच कोटी किंमतीचे अडीच किलो पांढरी मेथ्याकूलॉन (एमडी ड्रग) मिळाले आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करणारी ही मुंबई पोलिसांची पहिलीच कारवाई मानली जात आहे. त्यामुळे शत्रुघ्न माळी आणि त्यांच्या पथकाचं विशेष कौतुक होत आहे.

पोलिसांना काही खात्रीलायक सूत्रांकडून या कारखान्याबाबत माहिती मिळाली होती. या कारखान्यातून 31 डिसेंबरच्या पार्ट्यांसाठी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय. कलीम रफिक खामकर, जकी अफरोज उर्फ पिट्टू आणि सुभाष रघुपती पाटील अशी आरोपींची नावे आहेत. यातील सुभाष हा बीएस्सी केमिकल पदवीधर आहे. त्याने एमडी ड्रग्ज तयार करण्याचा फॉर्म्युला निर्माण केला होता, अशी माहिती पोलिसांच्या कारवाईतून समोर आली आहे.

हेही वाचा : आता हे काय नवं संकट! ओमिक्रॉन कोरोनानंतर Florona ची दहशत; इथं सापडला पहिला रुग्ण

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. "गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर आम्ही कारवाई केली. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत अडीच कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आलं आहे. ड्रग्ज आणि गुटखामुक्त करण्याचा आमचं ध्येय आहे. त्यादिशेने आमची वाटचाल सुरु आहे. दरम्यान या प्रकरणात कोण-कोण अडकलंय याचा पूर्ण तपास सुरु आहे", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

याआधी ड्रग्जविरोधात 9 डिसेंबरला मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली होती. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) एअर इंटेलिजन्स यूनिटने (AIU) ही कारवाई केली होती. विमानतळावर आलेल्या दोन परदेशी नागरिकांकडे तब्बल 247 कोटींचे ड्रग्ज सापडले होते. आरोपींकडे तब्बल 35 किलो हेरॉईन (Heroin) सापडलं होतं. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ही सर्वात मोठी कारवाई होती.

First published:
top videos