मुंबई, 31 डिसेंबर : इंडिगो पेंट्सच्या (Indigo Paints) शेअर्समध्ये शुक्रवारी प्रचंड वाढ झाली. इंडिगो पेंट्सचे शेअर्स BSE वर इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान 15.7 टक्के वाढून 2,247 वर पोहोचले होते. इंडिगो पेंट्सच्या शेअर्सने अलीकडेच 27 डिसेंबर रोजी 1900 रुपयांची पातळी गाठली, जी गेल्या 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी होती. तसेच, 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून शेअर 43.2 टक्के खाली आले होते. इंडिगो पेंट्सच्या शेअरची किंमत 3 फेब्रुवारी 2021 रोजी 3,348 वर पोहोचली, जो 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. एलियनने अपहरण केल्यास मिळेल विमा संरक्षण; मिशी, वॅलेन्टाईन असे जगभरातील अजब विमा ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने (Motilal Oswal) अलीकडेच या स्टॉकला ‘BUY’ रेटिंग देऊन कव्हर करण्यास सुरुवात केली आणि त्याची टार्गेट प्राईज 2270 आहे. ब्रोकरेज फर्मने सांगितले होते की इंडिगो पेंट्सने भारतीय पेंट उद्योगातील एन्ट्री बॅरिअर्सच्या आव्हानांवर मात केली आहे. ब्रोकरेजने सांगितले की इंडिगो पेंट्सला प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून वेगळे उत्पादन ऑफर करणे, ग्रामीण भारतात डिस्ट्रिब्युशन नेटवर्क तयार करणे आणि ब्रँडिंगमध्ये अधिक गुंतवणूक करणे याचा फायदा झाला आहे. Post Office सोबत 5 हजारात सुरु करा काम, दरमाह कमावा हजारो रुपये, काय करावं लागले? ब्रोकरेजने पुढे सांगितले की पेंट उद्योगाची एकूण उलाढाल सुमारे 545 अब्ज रुपये आहे आणि 2019 ते 2024 या आर्थिक वर्षात सुमारे 12 टक्के वार्षिक दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे. “आम्ही इंडिगो पेंट्सची विक्री FY21-2024 साठी वार्षिक 28 टक्के, EBITDA 35 टक्के आणि करानंतरचा नफा (PAT) 41 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा करतो. इंडिगो पेंट्सचा शेअर NSE वर 8.42 टक्क्यांनी म्हणजेच 163 रुपयांनी वाढून 2,107 रुपयांवर बंद झाला. तथापि, 2021 हे वर्ष कंपनीसाठी चांगले राहिले नाही आणि कंपनीच्या गुंतवणूकदारांना यावर्षी 32.41 टक्के नुकसान सहन करावं लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.