मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ओमायक्रॉनबाधित 156 पैकी फक्त 9 जण हॉस्पिटलमध्ये दाखल, लस घेणाऱ्याचा आश्चर्यकारक रिपोर्ट!

ओमायक्रॉनबाधित 156 पैकी फक्त 9 जण हॉस्पिटलमध्ये दाखल, लस घेणाऱ्याचा आश्चर्यकारक रिपोर्ट!

282 पैकी फक्त 17 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पहिला डोस घेतलेले फक्त तीन जण रुग्णालयात दाखल झाले

282 पैकी फक्त 17 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पहिला डोस घेतलेले फक्त तीन जण रुग्णालयात दाखल झाले

282 पैकी फक्त 17 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पहिला डोस घेतलेले फक्त तीन जण रुग्णालयात दाखल झाले

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 31 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा ( maharashtra Omaicron update) राज्यात समुह संसर्ग सुरू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यातच कोरोनाचे रुग्ण सुद्धा वाढत आहे. पण, ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असले रुग्ण बरे होण्याचा प्रमाण जास्त आहे. ओमायक्रॉनबाधित 156 पैकी केवळ 9 जणांना रुग्णालयीन उपचारांची गरज भासल्याचे समोर आले आहे. तर राज्यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ (Delta variant) चे 13 टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ (Delta Derivatives) चे 32 टक्के तर ‘ओमायक्रॉन’चे 55 टक्के रुग्ण आढळले आहे.

कोविड 19 विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या चाचणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केली जात आहेत. या अंतर्गत  मुंबईतील २८२ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे १३ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ३२ टक्के तर ‘ओमायक्रॉन’ चे ५५ टक्के रुग्ण आढळले आहेत.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सातव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण 376 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील 282 रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या 282 नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष देण्यात येत आहेत.

282 रुग्णांचे वयोगटनिहाय वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे.

•    ० ते २० वर्षे वयोगट  - ४६ रुग्ण (१६ टक्के)  

•    २१ ते ४० वर्षे वयोगट - ९९ रुग्ण (३५ टक्के)

•    ४१ ते ६० वर्षे वयोगट - ७९ रूग्ण (२८ टक्के)

•    ६१ ते ८० वयोगट - ५४ रुग्ण (१९ टक्के)

•    ८१ ते १०० वयोगट - ४ रुग्ण (१ टक्के)

ओमायक्रॉन विषाणू उपप्रकाराची बाधा झालेल्या 156 पैकी फक्त 9 जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी कोणालाही लक्षणे आढळली नाहीत. यासोबत, त्यांना प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता विभागातही दाखल करावे लागले नाही. असे असले तरी, नागरिकांनी गाफील न राहता दक्ष राहणे गरजेचे आहे.

या २८२ पैकी वय वर्ष १८ पेक्षा कमी असलेल्या वयोगटामध्ये ३२ जण मोडतात. पैकी, ४ जणांना डेल्टा व्हेरिअंटची बाधा, १२ जणांना डेल्टा डेरिव्हेटीव्हची लागणआणि १६ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली होती.

(Welcome 2022: न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत, पाहा VIDEO)

कोविड लसीकरण निकष लक्षात घेता, २८२ पैकी फक्त १७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पहिला डोस घेतलेले फक्त तीन जण रुग्णालयात दाखल झाले. तर दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी अवघे १० जण रुग्णालयात दाखल झाले. लसीचा एकही डोस न घेतलेल्या ८१ पैकी चार जण रुग्णालयात दाखल झाले.

तर डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित दोघांनाच अतिदक्षता उपचारांची गरज भासली. यापैकी एका डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. सदर व्यक्ती ही ६० वर्षेपेक्षा अधिक वयाची ज्येष्ठ नागरिक होती. त्यांना मधुमेह व अतिदाबाचाही त्रास होता. तसंच त्यांनी कोविड लसीचा फक्त पहिला डोस घेतला होता.

(LGBTQ वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार अखेर बोलले, सोनम कपूरच्या टीकेवर म्हणाले...)

कोविड विषाणूचा धोका अद्याप टळलेला नसल्याने, नागरिकांनी गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन कायम ठेवले पाहिजे. सर्वांनी मास्कचा उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन कठोरपणे करणे आवश्यक आहे. कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर प्रत्येकाने वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे देखील आवश्यक आहे.

First published: