मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

LGBTQ वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार अखेर बोलले, सोनम कपूरच्या टीकेवर म्हणाले...

LGBTQ वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार अखेर बोलले, सोनम कपूरच्या टीकेवर म्हणाले...

  'आता तुम्ही लेस्बियन आणि गे लोकांना विद्यापीठ समितीचे सदस्य म्हणून घेणार का? असं विधान केल्यामुळे सुधीर मुनगंटीवार

'आता तुम्ही लेस्बियन आणि गे लोकांना विद्यापीठ समितीचे सदस्य म्हणून घेणार का? असं विधान केल्यामुळे सुधीर मुनगंटीवार

'आता तुम्ही लेस्बियन आणि गे लोकांना विद्यापीठ समितीचे सदस्य म्हणून घेणार का? असं विधान केल्यामुळे सुधीर मुनगंटीवार

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 31 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनात विद्यापीठ सुधारणा विधेयक सादर करण्यात आले होते, त्यावेळी भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार  (BJP MLA Sudhir Mungantiwar) यांनी LGBTQ एलजीबीटीक्यू (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर) समुदायाबद्दल विधान केलं होतं. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. पण,'कुणाचा अधिकार वंचित व्हावा या मागची माझी भावना नव्हती. कुणाचा अवमान करण्याचा हेतू नव्हता' असा खुलासा मुनगंटीवार यांनी केला आहे.

'आता तुम्ही लेस्बियन आणि गे लोकांना विद्यापीठ समितीचे सदस्य म्हणून घेणार का? असं विधान केल्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अभिनेत्री सोनम कपूरने अशिक्षित म्हणून टीका केली होती. आज मुनगंटीवार यांनी यावर खुलासा केला आहे.

LGBT समुहाला विरोध नाही पण जे काही दिलंय ते स्पष्ट असावं. मुळात प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. सोनम कपूर या चांगल्या अभिनेत्री आहे. त्यांचा अभिनय चांगला आहे. मी सुद्धा त्यांचे सिनेमे पाहत असतो. त्या चांगल्या कलाकार आहे. पण विधानसभेत मी जे बोललो ते त्याच्या त्या साक्षीदार नव्हत्या. त्यांना जी माहिती आहे, ती प्रथमदर्शनी साक्षीदार म्हणून नाही' असं मुनगंटीवार म्हणाले,

तसंच, 'विद्यापीठ सुधारणा विधेयक आणले ते विधेयक या अधिवेशनात न घेता पुढील अधिवेशनात घ्यावे अशी विनंती केली होती. या विधेयकावर चर्चा झाली पाहिजे, त्या विधेयकामध्ये जे शब्द आहे, त्याचा मी उपयोग केला. कोणाचा  अधिकार वंचित व्हावा या मागची माझी भावना नव्हती. कुणाचा अवमान करण्याचा हेतू नव्हता. या विधेयकावर पूर्ण चर्चा व्हावी म्हणून मी विधान केलं होतं' अशी सारवासारवही मुनगंटीवार यांनी केली.

काय म्हणाले होते मुनगंटीवार?

हाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाबाबत विवादास्पद विधान केले होते. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाबाबत ते बोलत होते. या विधेयकात एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांनाही विद्यापीठ बोर्डावर (LGBTQ people on University Board) येण्याची परवानगी मिळण्याबाबत सुधारणा करण्यात आली होती. यावर विरोध दर्शवत मुनगंटीवार म्हणाले, 'आता तुम्ही लेस्बियन आणि गे लोकांना विद्यापीठ समितीचे सदस्य म्हणून घेणार का? यासाठी खरं तर एक संयुक्त वैद्यकीय समितीची स्थापना करायला हवी. यात (विधेयकात) बायसेक्शुअल आणि असेक्शुअल (Mungantiwar statement about Asexual relations) संबंधांचा उल्लेख आहे. पण याची व्याख्या अद्याप कोणीच केली नाही.' एवढ्यावरच न थांबता, मुनगंटीवार पुढे म्हणाले, 'जर एखाद्या व्यक्तीचे एखाद्या प्राण्यासोबत असेक्शुअल संबंध आहेत, तर तो प्राणी येऊन सांगणार आहे का, की आमच्यात असेक्शुअल संबंध होते? काय चाललंय हे?'

अधिवेशनातील मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एलजीबीटीक्यू समुदायासोबतच इतर नेटीझन्सही त्यांच्यावर टीका करत आहेत.

First published: