Home /News /mumbai /

VIDEO: वांद्र्यात इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

VIDEO: वांद्र्यात इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

वांद्र्यात एका इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला (One Person Died After Part of a Building Collapsed) आहे. तर, चार जण जखमी झाले आहेत.

    मुंबई 07 जून : वांद्र्यात एका इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला (One Person Died After Part of a Building Collapsed) आहे. तर, चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांनीही ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे. ही घटना वांद्रा पूर्वमधील आहे. मलब्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती असल्यानं काही स्थानिकांच्या मदतीनं मलबा बाजूला काढण्याचं काम अग्निशामक दलाचे जवान करत आहेत. सिद्दीकी यांनी सांगितलं, की मुंबई महापालिकेला मागील तीन तासांपासून याठिकाणी कामगार पाठवण्याची विनंती केली आहे मात्र आतापर्यंत घटनास्थळी केवळ दोन कामगार दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीनं सध्या याठिकाणी काम सुरू आहे. आधीच गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा मोठा फटका सामान्य जनतेला बसलेला आहे. मुंबईत कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे. अशात आता पावसाळा सुरू होताच इमारती कोसळण्याच्या तसंच इतर दुर्घटनांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Accident, Mumbai News, Thane building collapse

    पुढील बातम्या