मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अधिवेशनाचा दुसरा दिवस; ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर होणार भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ?

अधिवेशनाचा दुसरा दिवस; ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर होणार भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ?

पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस (2nd Day of Monsoon Session) परत एकदा वादळी ठरणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आज भाजप विधिमंडळ परिसरामध्ये महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई 06 जुलै : पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस (2nd Day of Monsoon Session) परत एकदा वादळी ठरणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाचे बारा आमदार (BJP MLA) ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निलंबित करण्यात आले. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरदेखील उमटले. आज विरोधक असलेलं भाजप विधिमंडळ परिसरामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी बाकावर असणाऱ्या नेत्यांसमोर वीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याचं लक्ष असणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पंतप्रधान घेणार उच्चस्तरिय बैठक;हे मंत्री लावणार हजेरी

सत्ताधारी पक्ष आज विधिमंडळामध्ये केंद्र सरकारने महिन्याला तीन कोटी लस उपलब्ध करून द्याव्या असा ठराव आणणार आहेत. यावरून परत एकदा राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष दिसण्याची शक्यता आहे. विधानसभेत आमदार निलंबित केल्यानंतर भाजप अधिक आक्रमक झालं आहे. आज महाविकास आघाडी सरकारमधील काही भ्रष्टाचाराची प्रकरणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस विधानसभेत मांडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील काही प्रमुख मंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होण्याची शक्यता असल्याचं समजतं.

जगातली सर्वांत वृद्ध हत्तीण आजारी;100 पार केलेली वत्सला कुठे आहे, काय झालंय तिला

सोमवारी निलंबित करण्यात आलेल्या आमदारांच्या मुद्द्याचे पडसाददेखील आज सभागृहात दिसण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्ष विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूकीच्या मागणीस आग्रही आहे. तसंच केंद्रातील कृषी कायद्याच्या विरोधातील ठरावाबाबत आज सभागृहात काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे. वास्तविक जर कृषी कायद्याच्याबाबत काँग्रेसचा केंद्र सरकारविरोधातील ठराव मंजूर झाला नाही तर मात्र पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही मित्र पक्षांनी काँग्रेस पक्षाच्या मागणीला केराची टोपली दाखवली, असंही म्हटलं जाईल. त्यामुळे आजच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये काँग्रेस आग्रही असलेल्या कृषी कायद्याबाबत ठराव आणला जाणार का याकडेही लक्ष आहे.

First published:

Tags: Assembly session, Session, State government