मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » जगातला सर्वांत वयोवृद्ध हत्ती आहे आपल्या जंगलात; पण वाईट बातमी - 100 हून अधिक वर्षांची वत्सला हत्तीण पडलीय आजारी
जगातला सर्वांत वयोवृद्ध हत्ती आहे आपल्या जंगलात; पण वाईट बातमी - 100 हून अधिक वर्षांची वत्सला हत्तीण पडलीय आजारी
जगातला सर्वात मोठा हत्ती आहे भारताच्या जंगलात. पण दुर्दैवाने शंभरी पार केलेली ही वत्सला हत्तीण आता काही दिवसांची सोबती आहे. कुठे आहे ती आणि काय झालंय पाहा PHOTO...
जगातली सर्वांत मोठी म्हणजे वयाने मोठी हत्तीण आहे ही. भारताच्या जंगलातच ती वाढली. 100 पार केलेल्या या हत्तीणीचं नाव आहे वत्सला. पण वाईट बातमी म्हणजे ती काही दिवसांचीच सोबती असेल.
2/ 6
मध्य प्रदेशातल्या पन्ना व्याघ्र प्रकल्प हा या वत्सलाचा अधिवास. 100 पार केलेल्या वत्सलाची दृष्टी अधू झाली आहे. काही दिवसांपासून तिने खाणं पिणंही सोडलंय. तिच्या आरोग्याबद्दल संपूर्ण नॅशनल पार्क चिंतेत आहे.
3/ 6
पन्ना व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापनानुसार वत्सला हत्तीणीचा जन्म इथेच झाला. ती इथल्या पर्यटकांचं आकर्षण होती.
4/ 6
वयोमानाने प्रथम वत्सलाची दृष्टी गेली. पन्ना व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव डॉक्टर डॉ. संजीव कुमार गुप्ता हे वात्सलाची काळजी घेत आहेत. कारण म्हातारपणामुळे वत्सलाची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.
5/ 6
पन्ना टायगर रिझर्व्हने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिचं नाव नोंदवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु तिचं जन्म प्रमाणपत्र नसल्यामुळे वत्सलाचं नाव रेकॉर्ड बुकमध्ये दाखल होऊ शकलेलं नाही.
6/ 6
पार्क व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार वत्सला आता काही दिवसांची सोबती आहे. कारण आता तिने जेवणही सोडलं आहे.