मराठी बातम्या /बातम्या /देश /

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पंतप्रधान मोदी घेणार उच्चस्तरिय बैठक; हे मंत्री लावणार हजेरी

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पंतप्रधान मोदी घेणार उच्चस्तरिय बैठक; हे मंत्री लावणार हजेरी

मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी (Cabinet Expansion) उच्चस्तरिय बैठक (High Level Meeting) होणार आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 06 जुलै : मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी (Cabinet Expansion) उच्चस्तरिय बैठक (High Level Meeting) होणार आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), जेपी नड्डा, राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण, धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल, प्रह्लाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) उपस्थित असतील. दोन आठवड्यांपूर्वी सर्व मंत्र्यांच्या मंत्रालयाच्या कामकाजाचा आढावा घेत पंतप्रधानांनी येत्या काळात त्यांची मंत्रालये कोणत्या नव्या योजना आखत आहेत याचा अहवालही त्यांच्याकडे मागविला होता.

लशीचा दुसरा डोस घेऊन घरी परतत होती; रस्त्यातच महिलेला मृत्यूने गाठलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा या आठवड्यात विस्तार होईल आणि 20 ते 22 मंत्री शपथ घेऊ शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 6 ते 8 जुलै दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या 53 मंत्री आहेत आणि विस्तारानंतर 81 सदस्य होऊ शकतात. यावेळी युती पक्षही मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकतात.

एका फ्लॅटच्या किंमतीला विकलं जातंय अख्खं गाव; नागरिक घर सोडून पसार, काय आहे याचं

कोणत्या राज्यातून किती मंत्री -

उत्तर प्रदेशमधून मोदी मंत्रिमंडळात तीन मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकेल. त्याचबरोबर बिहारचे दोन ते तीन मंत्री, मध्य प्रदेशचे एक ते दोन मंत्री. महाराष्ट्रातूनही दोन मंत्र्यांच्या सहभागाची चर्चा आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमधून प्रत्येकी एका मंत्र्याला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकेल. राजस्थानमधील एक, आसाममधील एक-दोन मंत्री यात सामील होऊ शकतात. पश्चिम बंगालमधून मोदींच्या मंत्रिमंडळात दोन नेत्यांना स्थान दिलं जाऊ शकतं.

First published:

Tags: Meeting, Modi government, Union cabinet