मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत Omicron Variant चं अस्तित्त्व?, मुंबईकरांना पाहावी लागणार आठवडाभर वाट

मुंबईत Omicron Variant चं अस्तित्त्व?, मुंबईकरांना पाहावी लागणार आठवडाभर वाट

नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (omicron variant) एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे राज्य सरकारने (state government) तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 30 नोव्हेंबर: सध्या कोरोना व्हायरसच्या (corona virus) नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (omicron variant) एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे राज्य सरकारने (state government) तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना केली आहे. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा असे निर्देशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे प्रशासनाला दिले आहे. अशातच मुंबईत ओमिक्रॉन प्रकार अस्तित्वात आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आणखी पाच ते सात दिवस लागणार आहेत.

सध्या, 24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून मुंबई विमानतळावर पोहोचलेल्या डोंबिवलीतील एक प्रवासी कोविडसाठी पॉझिटिव्ह आला आहे. त्याचे नमुने सोमवारी सकाळी सात रस्त्याजवळील कस्तुरबा रुग्णालयात असलेल्या बीएमसीच्या जीनोम प्रयोगशाळेत नेण्यात आले.

हेही वाचा-  Breaking News: मुंबईत उद्यापासून सुरु होणार नाहीत शाळा, आयुक्तांनी दिली नवी तारीख

ज्या देशांतून नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला आहे, अशा लोकांशी पालिकेनं संपर्क साधला. बीएमसीने गेल्या 15 दिवसांत परदेशातून शहरात आलेल्या 100 लोकांशी संपर्क साधला आणि त्यांची चाचणी केली आहे. त्यापैकी कोणीही कोविड पॉझिटिव्ह नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या पंधरवड्यात या देशांतून मुंबई विमानतळावर उतरलेले आणखी 400 शहराच्या हद्दीबाहेर किंवा इतर जिल्ह्यात राहतात. BMC त्यांच्या कस्तुरबा प्रयोगशाळेत प्रत्येक अनुक्रम चक्रात 300 ते 350 नमुने तपासते.

हेही वाचा- एक बाटली आणि चौघांचा बळी; सुसाट कारने 100 फूट हवेत उडवलं, थरारक घटनेचा VIDEO

आमच्याकडे आधीच रुग्णालये आणि विमानतळांवरून आमच्या नियमित प्रोटोकॉलनुसार 200 कोविड-पॉझिटिव्ह नमुने गोळा केले गेले आहेत, असं बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले. बीएमसी पुढील 24 ते 48 तासांत आणखी 100-150 नमुने गोळा करतील, ज्यांना पूर्ण होण्यास तीन दिवस लागतील. आपल्याला आठवड्याच्या शेवटी किंवा सोमवार यांचा निकाल मिळण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं.

कोरोनासाठी राज्य सरकारची संपूर्ण नवी नियमावली

दरम्यान, राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे. शनिवारी जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम आणि दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा- मेरे पास माँ है! नौदल प्रमुखांचा हा Video पाहून सर्वच होतील Emotinal

राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारला दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातून येणाऱ्या प्रवाशी विमानांची वाहतूक थांबावावी किंवा योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे.

First published:

Tags: BMC, Coronavirus, Mumbai