मराठी बातम्या /बातम्या /देश /

मेरे पास माँ है!, भावूक करणारा Video,नौदल प्रमुख म्हणून पदभार स्विकारताच घेतले आईचे आशीर्वाद

मेरे पास माँ है!, भावूक करणारा Video,नौदल प्रमुख म्हणून पदभार स्विकारताच घेतले आईचे आशीर्वाद

आर हरी कुमार यांनी पदभार स्विकारताच आईचा आशीर्वाद घेतला आहे.

आर हरी कुमार यांनी पदभार स्विकारताच आईचा आशीर्वाद घेतला आहे.

आर हरी कुमार यांनी पदभार स्विकारताच आईचा आशीर्वाद घेतला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: नवे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार (Admiral R Hari Kumar ) यांनी भारतीय नौदलाचे नवे प्रमुख (new chief of Naval Staff) म्हणून पदभार स्वीकारला आहे. निवर्तमान नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी भारतीय नौदलाची कमान अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांच्याकडे सोपवली आहे. हरी कुमार यांनी पदभार स्विकारताच आईचा आशीर्वाद घेतला आहे.

नौदलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अ‍ॅडमिरल आर हरि कुमार यांनी त्यांची आई श्रीमती विजय लक्ष्मी यांचा आशीर्वाद घेतले आणि त्यांना मिठी मारली. तो एकदम भावूक क्षण सर्वांना पाहायला मिळाला. यावेळी त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.

केंद्र सरकारनं व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांची पुढील नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. हरी कुमार याआधी नौदलाच्या वेस्टर्न कमांडचे कमांडिंग-एन-चीफ म्हणून काम पाहिलं आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर हरी कुमार म्हणाले, सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करतील.

निवर्तमान नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग म्हणाले, गेल्या 30 महिन्यांत भारतीय नौदलाचे नेतृत्व करणे हा मोठा सन्मान आहे. हा काळ आव्हानांनी भरलेला आहे. कोविड ते गलवन संकटापर्यंत अनेक आव्हाने होती. अतिशय सक्षम नेतृत्वाच्या हातात नौदलाची धुरा सोपवली. अ‍ॅडमिरल आर हरी कुमार म्हणाले, 41 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर अ‍ॅडमिरल करमबीर सिंग आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. भारतीय नौदल त्यांचे सदैव ऋणी राहील.

अ‍ॅडमिरल हरी कुमार 38 वर्षे नौदलात

अ‍ॅडमिरल हरी कुमार यांचा जन्म 1962 मध्ये झाला आणि ते 1983 मध्ये नौदलात सामील झाले. 38 वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौका, INS विराट, कमांडिंग ऑफिसर (CO) च्या रँकसह, INS कोरा, निशंक आणि रणवीर या युद्धनौकांसह कमांडिंग केले आहे.

हरी कुमार यांनी नौदलाच्या वेस्टर्न कमांडच्या वॉरफेअर फ्लीटचे फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून काम केले आहे. वेस्टर्न कमांडच्या सीएनसीच्या पदापूर्वी, हरी कुमार दिल्लीत सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अंतर्गत चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (आयडीएस) म्हणून कार्यरत होते.

हेही वाचा- Mumbai: जिल्हा परिषदेनं मेंदू ठेवला गहाण; उर्दू शाळेत केली मराठी शिक्षकाची नेमणूक

अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांना परम विशिष्ट, अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेचं कमांड केलं आहे. आयएनएस विराटचे कमांडिंग ऑफिसर राहिले आहेत. आयएनएस कोरा, निशंक आणि रणवीर यांनी युद्धनौकांचे नेतृत्व केले आहे. वेस्टर्न कमांडच्या वॉरफेअर फ्लीटमध्ये सेवा दिली. सीडीएसने बिपिन रावत यांच्यासोबतही काम केले आहे.

First published:

Tags: Indian navy