Home /News /mumbai /

मुंबईत Omicron Variant चा शिरकाव?, BMC नं पाठवलेल्या जीनोम सिक्वेन्सिंगचा आला रिपोर्ट

मुंबईत Omicron Variant चा शिरकाव?, BMC नं पाठवलेल्या जीनोम सिक्वेन्सिंगचा आला रिपोर्ट

नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (omicron variant) एकच खळबळ माजली. त्यामुळे राज्य सरकारने (state government) तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना केलीय.

मुंबई, 02 डिसेंबर: एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोरोना व्हायरसच्या (corona virus) नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (omicron variant) एकच खळबळ माजली. त्यामुळे राज्य सरकारने (state government) तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना केली आहे. त्यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीएमसीनं जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या एका नमुन्याचा निकाल समोर आला आहे. हा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत एकही ओमिक्रॉन केस नाही, अशी माहिी सूत्रांनी सीएनएन न्यूज 18 ला दिली आहे. दरम्यान,आणखी काही नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचे निकाल लवकरच येणार असल्याचं समजतंय. हेही वाचा- IND vs NZ: विराटसाठी मुंबई टेस्टमध्ये 'या' खेळाडूला वगळणार, वाचा द्रविडच्या मनात चाललंय काय?  24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून मुंबई विमानतळावर पोहोचलेल्या डोंबिवलीतील एक प्रवासी कोविडसाठी पॉझिटिव्ह आला होता. त्याचे नमुने सोमवारी सकाळी सात रस्त्याजवळील कस्तुरबा रुग्णालयात असलेल्या बीएमसीच्या जीनोम प्रयोगशाळेत नेण्यात आले होते. ज्या देशांतून नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला आहे, अशा लोकांशी पालिकेनं संपर्क साधला. बीएमसीने गेल्या 15 दिवसांत परदेशातून शहरात आलेल्या 100 लोकांशी संपर्क साधला आणि त्यांची चाचणी केली आहे. त्यापैकी कोणीही कोविड पॉझिटिव्ह नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या पंधरवड्यात या देशांतून मुंबई विमानतळावर उतरलेले आणखी 400 शहराच्या हद्दीबाहेर किंवा इतर जिल्ह्यात राहतात. BMC त्यांच्या कस्तुरबा प्रयोगशाळेत प्रत्येक अनुक्रम चक्रात 300 ते 350 नमुने तपासते. हेही वाचा- जळगावात Major Accident, 3 जण जागीच ठार; सहा जखमी कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा असे निर्देशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे प्रशासनाला दिले आहे. कोरोनासाठी राज्य सरकारची संपूर्ण नवी नियमावली दरम्यान, राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे. शनिवारी जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम आणि दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारला दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातून येणाऱ्या प्रवाशी विमानांची वाहतूक थांबावावी किंवा योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: BMC

पुढील बातम्या