जळगाव, 02 डिसेंबर: चाळीसगाव (Chalisgaon taluka) तालुक्यातील हिरापूर गावाजवळ भीषण अपघात (Terrible Accident) झाला आहे. चारचाकी गाडी पलटल्यानं ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत.
बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी झालेल्यांमध्ये तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.त्यांना प्राथमिक उपचारानंतर धुळे येथे रवाना करण्यात आले.
हेही वाचा- Weather update: आज राज्यात पावसाचा जोर वाढला, या जिल्ह्यांसाठी Orange Alert
समोर आलेल्या माहितीनुसार, डोंगरगाव येथील काही कामगार कामासाठी मनमाड येथे गेले होते. यावेळी क्रूझर गाडीने (MH 13 AC 5604) घरी डोंगरगावला परत येत असताना रात्री दहाच्या सुमारास चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावरील हिरापूर गावाजवळ क्रूझर अचानक घसरली. गाडी वेगात असल्यानं क्रूझर गाडी रस्त्यावर आदळली आणि मोठी दुर्घटना घडली. या अपघातात गाडीतील 3 जण जागीच ठार झाले.
नाना भास्कर कोळी, विकास जलाल तडवी आणि मुक्तार तडवी या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
जखमींची नावे
अनीस तडवी (35)
चंदन हरीश पाटील (27),
माधान नारायण पाटील (30)
नितीन बाळू पाटील ( 26)
दिलीप शबीर तडवी (35)
समीर राजू तडवी (23)
स्वराज्य स्वप्नील पाटील
अपघाताची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी तातडीने मदत करून रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं. .स्वतः मंगेश चव्हाण यांनी यावेळी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींवर उपचार करण्यासंदर्भात डॉक्टरांना सूचना केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jalgaon