मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Omicron व्हेरिएंटचं सावट..! दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

Omicron व्हेरिएंटचं सावट..! दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 11 डिसेंबर: काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या कोरोना व्हायरसनं (corona virus) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती चिंताजनक झाली आहे.देशात दिवसेंदिवस ओमायक्रॉन व्हेरिएंट वाढताना दिसत आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) भारतातील पाच राज्यांमध्ये पसरला आहे आणि आतापर्यंत एकूण 32 प्रकरणांची नोंद करण्यात आली.

दरम्यान, ही दिलासादायक बाब आहे की सर्व प्रकरणांमध्ये प्रामुख्याने सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुजरातमधील जामनगरमध्ये दोन तर महाराष्ट्रात सात नवीन रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा-  मुंबईमध्ये आजपासून रॅली, मोर्चे काढण्यास परवानगी नाही, पोलिसांनी काढला आदेश

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, कोविड-19 पासून स्वतःचे आणि आपल्या सभोवतालच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आपण कोविड प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे.

ते म्हणाले की, सर्व व्हेरिएंटमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणं 0.04 टक्क्यांहून कमी आहेत. सर्व प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. वैद्यकीयदृष्ट्या, Omicron आतापर्यंत आरोग्य सेवा व्यवस्थेवर भार टाकत नाही. मात्र सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र

आतापर्यंत महाराष्ट्र (17) आणि राजस्थानमध्ये 9 ओमायक्रॉनच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये तीन, कर्नाटकात दोन आणि दिल्लीत एक अशी प्रकरणं आहेत. गेल्या आठवड्यात, एकूण प्रकरणांपैकी 52% प्रकरणे केरळमध्ये नोंदवली गेली आहेत. सतत 14 दिवसांपर्यंत दररोजच्या प्रकरणं 10 हजारांहून कमी आणि 10 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणां असलेली केवळ दोन राज्य केरळ आणि महाराष्ट्र आहे.

पुण्यातील पहिला ओमायक्रॉन बाधित रुग्ण कोरोनामुक्त

डोंबिवलीतील ओमायक्रॉन बाधित रुग्ण कोरोनामुक्त (Dombivli omicron affected man tests negative) झाल्यानंतर आता पुण्यातीलही एक ओमायक्रॉन रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. निश्चितच या बातमीमुळे पुणेकरांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा दिलासा मिळाला आहे. (Big relief as Pune omicron infected patient tests negative for covid 19)

हेही वाचा-  'सरकारी मेहमान घर आने वाले है' नवाब मलिकांचं खळबळजनक ट्वीट

 हा रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर या काळात फिनलँड येथे गेला होता. त्यानंतर तो पुण्यात परतला होता. 29 नोव्हेंबर रोजी त्याचा ओमायक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोणतीही लक्षणं नसल्यामुळे तो संस्थात्मक क्वॉरनटाईनमध्ये होता. 10 दिवसानंतर त्याची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली आणणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी खबरदारी म्हणून पुढील 7 दिवस त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus