Home /News /mumbai /

सावधान, मुंबईत Omicron वाढतोय! आणखी 3 रुग्ण सापडले

सावधान, मुंबईत Omicron वाढतोय! आणखी 3 रुग्ण सापडले

राज्याची राजधानी मुंबईमध्ये (mumbai) ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे.

राज्याची राजधानी मुंबईमध्ये (mumbai) ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे.

राज्याची राजधानी मुंबईमध्ये (mumbai) ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे.

    मुंबई, 10 डिसेंबर : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे (Coronavirus Omicron Variant) जगभरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातही  (Omicron patient in maharashtra) आता ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये (mumbai) ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे. याआधी मुंबईत दोन रुग्ण आढळले होते. तर महाराष्ट्रात रुग्णांची संख्याही 17 वर पोहोचवली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रात 3 रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे‌ निदान झाले आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 5 वर पोहोचली आहे. या रुग्णांना कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. तथापि खबरदारीची उपाययोजना म्हणून संबंधित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. वारंवार होणाऱ्या डोकेदुखीनं त्रस्त आहात? हे 5 आयुर्वेदिक उपाय करून पहा परिणाम धक्कादायक म्हणजे, या 7 रुग्णांपैकी चार जणांनी कोरोनाची लस घेतलेली होती. तर एका व्यक्तीने एकच कोरोनाचा डोस घेतला होता. धक्कादायक म्हणजे, या सात जणांमध्ये एका 3.5 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या सातही जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. धारावीत ओमायक्रॉनचा रुग्ण तर परदेशातून मुंबईतील धारावीत आलेल्या एका नागरिकाचा कोविड रिपॉर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आता समोर आला असून ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेली व्यक्ती ही मौलवी आहे. मुंबई आल्यानंतर ते धारावी येथील एका मशिदीत वास्तव्यास होते. Video Viral:क्लास बंक करून विद्यार्थ्यांचा पबमध्ये अश्लील डान्स;कॉलेजकडून कारवाई सुरुवातील या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. तो अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले आहे. धारावीमध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. या मौलवीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या मौलवीला तातडीने क्वारंटाइन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 4 रुग्ण तर राज्यात ओमायक्रॉनची रुग्ण संख्याही आता 17 वर पोहचली आहे. राज्यात आज 7 नवीन रुग्ण आढळले आहे. मुंबईमध्ये ३ रुग्ण आढळले आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये 4 रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईतील तिन्ही रुग्ण हे परदेशातून आलेले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या