...नाहीतर OBCची महाराष्ट्रात वेगळी जनगणना करा, सर्वच पक्षांचे आमदार आक्रमक

...नाहीतर OBCची महाराष्ट्रात वेगळी जनगणना करा, सर्वच पक्षांचे आमदार आक्रमक

असं झालं नाही तर OBCना मिळणारं आरक्षण रद्द होण्याची भीतीही अनेक नेत्यांनी बोलतांना व्यक्त केली.

  • Share this:

मुंबई 28 फेब्रुवारी : जातीनिहाय जनगणना करावी असा ठराव विधानसभेने मंजूर केला होता. पण अशा प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्य केला नाही. त्यावरून आज विधानसभेत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. फक्त तांत्रिक कारणांमुळे केंद्राने असा प्रस्ताव फेटाळला असेल तर OBCची महाराष्ट्रात राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून जनगणना करा अशी मागणी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता त्याचं काय झालं असा सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी उपस्थितीत केला होता. त्यावर सर्वच पक्षांच्या आमदारांनी आपली मतं मांडली आणि या प्रश्नावर सर्वच पक्ष एक आहेत असं दाखवून दिलं.

यावर बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, केंद्राला राज्याने ठराव करून पाठवला होता. तसा पत्रव्यवहारही त्यांच्याशी करण्यात आला होता. जातीनिहाय जनगणना 1981मध्ये घेतली होती पण प्रकाशीत नाही, 1991 पासून जातनिहाय जनगणना करत नाही असं उत्तर केंद्र सरकराच्या जनगणना केल्या जाणाऱ्या विभागाने कळवले आहे.

पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणार निघाला त्याच गावचा तरुण

अनुसूचित जाती जमाती शिवाय अन्य जनगणना करणे बंधनकराक नाही, अस जनगणना विभागाने कळविले आहे. यावर बोलताना छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, असा ठराव बिहार राज्यात विधानसभेत केला होता. जातगणना करावी अशी मागणी केली, आता आधुनिक तंत्रज्ञान आले जनगणना करणे अधिक सोईस्कर आहे. त्यामुळे केंद्रातील जनगणना विभागाने कळवले हे कारण पटत नाही.

भाजपच्या माजी आमदाराविरोधात बलात्काराचा गुन्हा, पक्षाच्या नगरसेविकेनेची तक्रार

देशात 54 % ओबीसी आहे. मोदीनी सगळे ठरवलं तर ओबीसी वर्ग जनगणना करता येईल. विशिष्ट निधी उपलब्ध होईल. ओबीसी मागास वर्गाच विकास होईल. आपण सीएम विरोधी पक्ष नेते आग्रही भूमिका मांडली तर जनगणना करता येईल, आपण ठराव केला त्यांना कळवले त्यांनी पुन्हा उत्तर देऊन आपण शांत बसलो अस होता काम नये, ओबीसी घटना न्याय देण्यासाठी सीएम डीसीएम आणि विरोधी पक्ष नेते यांनी दिल्ली दाद मागावी.

शिक्षक की हैवान? पाण्यात विष कालवून विद्यार्थिनिची केली हत्या

तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. मुख्यमंत्र्यांसह सर्वच पक्षांचे शिष्टमंडळ घेऊन या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ या असंही त्यांनी सांगितलं.

 

First published: February 28, 2020, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading