पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणार निघाला त्याच गावचा तरुण

पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणार निघाला त्याच गावचा तरुण

वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेमुळे जिल्हयात संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

  • Share this:

नांदेड 28 फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यातील सोनखेड येथे पाच वर्षाच्या मुलीचे अपहर करून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. याच गावातील 28 वर्षीय सुग्रीव उर्फ बाबुराव मोरे या नराधम तरुणाने चिमुकलीवर अत्याचार केल्याचं उघड झालंय. गावातील पाच वर्षांच्या मुलीला पळवून नेलं होतं. त्यानंतर परिसरातील शेतात त्याने तिच्यावर अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी शेतात पीडित मुलगी विवस्त्र अवस्थेत आढळली होती. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेमुळे जिल्हयात संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

दरम्यान या अत्याचाराच्या निषेधार्थ गावातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे नागपूर-तुळजापूर महामार्ग ठप्प पडलाय. अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी सुग्रीव मोरेला कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय. याच मागणीसाठी ग्रामस्थानी रस्ता अडवून धरलाय. या घटनेनंतर सलग आज तिसऱ्या दिवशी सोनखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोनखेडचे ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत. या सर्व घडामोडीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत गावकऱ्यांना शांतता पाळण्याचं आवाहन केलंय.

शिक्षक की हैवान? पाण्यात विष कालवून विद्यार्थिनिची केली हत्या

काय आहे प्रकरण?

अवघ्या 5 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे. मुलाला निर्जनस्थळी शेतात नेऊन तिच्यावर नराधमाने लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील सोनखेड येथील 5 वर्षीय चिमुकली मंगळवारी सायंकाळपासुन बेपत्ता झाली होती. या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता.

इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाआधी कोल्हापूरमधील वातावरण तापलं

प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला मात्र ती चिमुरडी सापडली नाही. बुधवारी सकाळी सोनखेड शिवारातील एका शेतात चिमुकली रडतांना सापडली. त्यावेळी तिच्या अंगावर कपडेही नव्हते. तिच्या शरीरावर जखमां होत्या. पीडित मुलीला तात्काळ शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सामना रंगणार...फडणवीसांच्या संकटमोचकाला घेरण्याची शिवसेनेची रणनीती

पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासात उघड झाले. सध्या मुलीची प्रक्रुती स्थीर असली तरी ती काही सांगण्याच्या मनस्थितीत नाही. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणामुळे सोनखेड मध्ये तणाव निर्माण झाला आहे.

 

 

First published: February 28, 2020, 12:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading