भाजपच्या माजी आमदाराविरोधात बलात्काराचा गुन्हा, पक्षाच्या नगरसेविकेनेच केली तक्रार

भाजपच्या माजी आमदाराविरोधात बलात्काराचा गुन्हा, पक्षाच्या नगरसेविकेनेच केली तक्रार

काही दिवसांपूर्वीच मेहेतांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पदांचे राजीनामे दिले होते.

  • Share this:

 विजय देसाई, मुंबई 28 फेब्रुवारी : मीरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहेता यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मीरा रोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे 3.35 ला हा गुन्हा दाखल झाला. भाजपच्या नगरसेविकेने दिलेल्या फिर्यादी वरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे अशी माहिती मीरा रोड पोलिसांनी दिलीय. काही दिवसांपूर्वीच मेहेतांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर खळबळ उडाली होती. राजकीय कराणांमुळेच हा व्हिडिओ व्हायरल केला गेल्याचाही आरोप होत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेहेता यांनी भाजपच्या सर्व पदांचे राजीनामे दिले होते. त्यांनी 24 फेब्रुवारीला एक व्हिडिओ फेसबुकवर टाकून राजीनाम्याची घोषणा केली होती. माझ्यामुळे भाजपला अडचण होऊ नये. माझ्या आचरणाने पक्षाचं नुकसान झालेलं मला आवडणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. गेली अनेक वर्ष समाजकारण आणि समाजसेवा करताना अनेकांशी संबंधत येत गेला. त्या सगळ्यांची मी माफी मागतो असंही त्यांनी म्हटलंय.

राजकारणात माझा इथपर्यंत प्रवास निश्चित असावा. यापुढे अशा वातावरणात पुढे जाणं शक्य नाही त्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतलाय असंही त्यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे. यानंतर चारच दिवसांनी त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आलाय.

सामना रंगणार...फडणवीसांच्या संकटमोचकाला घेरण्याची शिवसेनेची रणनीती

मेहेतांविरुद्ध या नगरसेविकेने अनेक महिन्यांपूर्वी आरोप केले होते, मात्र कारवाई होत नव्हती. बुधवारी हा विषय विधान परिषदेतही उपस्थित करण्यात आला होता. मेहेतांविरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी अनेक आमदारांनी केली होती.

इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाआधी कोल्हापूरमधील वातावरण तापलं

त्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले होते. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित महिलेने तक्रारच दिली नसल्याचं सांगितंलं होतं. त्यानंतर चक्र फिरली आणि त्या नगरसेविकेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पहाटे हा गुन्हा नोंदविण्यात आला.

First published: February 28, 2020, 11:04 AM IST
Tags: BJP Leader

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading