मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिक्षक की हैवान? पाण्यात विष कालवून विद्यार्थिनिची केली हत्या

शिक्षक की हैवान? पाण्यात विष कालवून विद्यार्थिनिची केली हत्या

दहावीत शिकणारी विद्यार्थिनी सानिकाला पाण्याच्या बाटलीतील पाणी पिल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर ती परतलीच नाही.

दहावीत शिकणारी विद्यार्थिनी सानिकाला पाण्याच्या बाटलीतील पाणी पिल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर ती परतलीच नाही.

दहावीत शिकणारी विद्यार्थिनी सानिकाला पाण्याच्या बाटलीतील पाणी पिल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर ती परतलीच नाही.

कोल्हापूर 28 फेब्रुवारी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरटी गावातील 10वीत शिकणाऱ्या सानिका नामदेव माळी हिच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा झालाय. या प्रकरणी संशयित आरोपी निलेश बाळू प्रधाने या शिक्षकाला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सानिकाच्या मृत्यूला जबाबदार असलेला शिक्षक प्रधाने याचा विरोधात गावात प्रचंड संतापाची भावना आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शिरटीमधील ग्रामस्थांनी त्याचा प्रतिकात्मक पुतळा तयार केला, त्याला चप्पलचा हार घातला आणि पुतळ्याचं दहन केलं. यावेळी सानिकाला न्याय मिळण्यासाठी गावातील प्रमुख मार्गावरून मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी संशयित शिक्षक प्रधाने याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपण सानिका हिला कुरुंदवाड येथील एका औषध दुकानातून विषारी औषध आणून दिलं असं सांगितलं. शिक्षकाने सानिका हिला विषारी औषध का आणून दिले, याचा उलगडा झालेला नाहीय. पण शिक्षकाकडून विद्यार्थ्याची हत्या केल्याच्या प्रकरणाने शिरटीसह शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी विषाची बाटली जप्त केली असून संबंधित दुकानदाराकडून औषध खरेदीचे बिल ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

दिल्लीतील हिंसाचावरून अमोल कोल्हेंनी साधला अमित शहांवर निशाणा

काय आहे प्रकरण?

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरटी गावातील दहावीच्या विद्यार्थिनीचा विषबाधेने मृत्यू झालाय. गेल्या पाच दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती पण अखेर तिचा गुरुवारी मृत्यू झालाय. पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसात दाखल केली आहे.

इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाआधी कोल्हापूरमधील वातावरण तापलं

सानिका माळी असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती सोळा वर्षांची होती. सानिकाचा मृत्यू झाल्यावर संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी तिचा  मृतदेह शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवला होता, तसेच पाण्याच्या बाटलीत विष आले कुठून याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका घेतली होती.

विषारी ताडी तयार करणाऱ्यांवर क्राईम ब्रँचचा छापा, आरोपींना अटक

तर नागरिक आणि व्यापाऱ्यांनीही गाव बंद ठेवून निषेध नोंदवला. नातेवाईक व नागरिकांच्या भूमिकेमुळे परिसरात आणि गावात तणावाच वातावरण निर्माण झाल होत. पण पोलिसांनी उशिरा का असेना घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. दहावीत शिकणारी विद्यार्थिनी सानिकाला पाण्याच्या बाटलीतील पाणी पिल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले होते. तिला उपचारासाठी शिरोळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तिला कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप आई-वडीलांनी केला आहे.

First published:

Tags: Kolhapur