मुंबई, 23 मे : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकल सेवा ओळखली जाते तशीच बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन अर्थात बेस्टची (BEST) बस सेवाही (Bus service)प्रसिद्ध आहे. आता बेस्ट बसने कात टाकली असून लवकरच 2100 इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात येणार आहे. मुंबईत आता फक्त इलेक्ट्रिक बसेस दिसणार आहे. पुढच्या वर्षभरात एकूण 2100 बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहे. बेस्ट बसेसच्या ताफ्यात आता वर्षभरात एकूण 2100 नव्या इलेक्ट्रिक बसेस दाखल होत आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OLECTRA) ने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कडून 2100 इलेक्ट्रिक बसेससाठी सर्वात मोठी मागणी मिळवली आहे. या मागणीचे मूल्य तब्बल 3675 कोटी इतके आहे. Evey Trans Private Limited (EVEY) ला BEST कडून लेटर ऑफ अवॉर्ड (LoA) प्राप्त झाले आहे. या आदेशानुसार, 12 वर्षांच्या कालावधीसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC)/Opex मॉडेलवर 2100 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यात येईल. 12 महिन्यांच्या कालावधीत बसेस वितरित केल्या जातील. ( IPL 2022 : ..तर गुजरात न खेळताच फायनलमध्ये पोहोचणार, जाणून घ्या Play Off चे नियम ) ऑलेक्ट्रा या बसेसची देखभाल देखील कराराच्या कालावधीत करेल. इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये अग्रगण्य कंपनी असलेली ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या करारानुसार, 12 मीटर एसी बसेस पुरवणार आहे. मुंबईत बेस्टसाठी आधीच कंपनीच्या ४० इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत. ( त्यांच्यामुळेच टीम इंडियात निवड झाली, ‘यॉर्कर’ सिंगने या 3 खेळाडूंना दिलं श्रेय ) सध्या, EVEY आणि Olectra Greentech Limited देशातील विविध राज्य परिवहन उपक्रम (STU) मध्ये इलेक्ट्रिक बस चालवत आहेत. पुणे (PMPML), हैदराबाद, गोवा, डेहराडून, सुरत, आणि अहमदाबाद, सिल्वासा आणि नागपूर ह्या शहरातील वाहतूक व्यवस्थेत या बसेस अतिशय उत्तम सेवा बजावत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.