Home /News /sport /

IPL 2022 : ...तर गुजरात न खेळताच फायनलमध्ये पोहोचणार, जाणून घ्या Play Off चे नियम

IPL 2022 : ...तर गुजरात न खेळताच फायनलमध्ये पोहोचणार, जाणून घ्या Play Off चे नियम

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल प्ले-ऑफचे (IPL 2022 Play Off) सामने मंगळवारपासून सुरू होणार आहेत. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Gujarat Titans vs Rajasthan Royals) होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात एलिमिनेटर होणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 मे : आयपीएल प्ले-ऑफचे (IPL 2022 Play Off) सामने मंगळवारपासून सुरू होणार आहेत. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Gujarat Titans vs Rajasthan Royals) होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात एलिमिनेटर होणार आहे. त्याआधी बीसीसीआयने प्ले-ऑफ आणि फायनलच्या नियमांबाबत माहिती दिली आहे. आयपीएलच्या नव्या नियमांनुसार प्ले-ऑफचे सामन्यांमध्ये पाऊस आला आणि नियमित वेळेत मॅच खेळवणं शक्य झालं नाही, तर विजेत्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये होईल, म्हणजेच 6 बॉलमध्ये विजय-पराभवाचा निर्णय होईल. आयपीएल नियमांनुसार जर एकही ओव्हरचा खेळ झाला नाही तर पॉईंट्स टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर असलेली टीम विजयी घोषित करण्यात येईल. म्हणजे गुजरात आणि राजस्थान यांच्यातला सामना पावसामुळे होऊ शकला नाही तर गुजरातची टीम प्ले-ऑफचा सामना न खेळताच फायनलमध्ये पोहोचेल, कारण पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या आणि राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखनऊ आणि आरसीबी यांच्यातला एलिमिनेटर सामनाही पावसामुळे होऊ शकला नाही तर लखनऊची टीम क्वालिफायर-2 ची मॅच खेळेल आणि आरसीबीचं आव्हान संपुष्टात येईल. क्वालिफायर आणि एलिमिनेटरच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. प्ले-ऑफवर पावसाचं सावट आयपीएल 2022 चा पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना कोलकात्याच्या इडन गार्डनवर मंगळवारी आणि बुधवारी होणार आहे. कोलकात्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून पाऊस आणि वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. स्टेडियमचा प्रेस बॉक्सलाही याचा फटका बसला आहे. पुढचे काही दिवस इकडे असंच हवामान असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाच्या शक्यतेमुळे हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. पावसाचा धोका लक्षात घेता मॅचच्या वेळेबाबतही नवीन नियम करण्यात आला आहे. एक मॅच पूर्ण होण्यासाठी 200 मिनिटांशिवाय 2 तास अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत. प्ले-ऑफच्या मॅचना पावसामुळे उशीर झाला तर रात्री 9.40 पर्यंतही मॅच सुरू होऊ शकते. आयपीएल फायनलच्या वेळेत आधीच बदल करण्यात आला आहे. 29 मे रोजी होणारा हा महामुकाबला 8 वाजता सुरू होणार आहे. याआधी लीग स्टेजच्या मॅच संध्याकाळी 7.30 वाजता सुरू व्हायच्या. 2 तासचा अतिरिक्त वेळ दिल्यामुळे एकही ओव्हर कमी करण्यात येणार नाही. म्हणजेच क्वालिफायर आणि एलिमिनेटरचे सामने रात्री 9.40 आणि फायनल 10.10 वाजता सुरू झाली तरी पूर्ण 40 ओव्हरची मॅच होईल. यापेक्षा जास्त वेळ पाऊस असेल तर मात्र ओव्हर कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल. फायनलसाठी राखीव दिवस 29 मे रोजी होणाऱ्या फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर पहिल्या दिवशी फायनल सुरू झाली आणि एकही बॉल फेकला गेला, तर दुसऱ्या दिवशी जिकडे मॅच थांबली होती तिकडूनच खेळाला सुरूवात होईल. क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यात पहिली इनिंग झाल्यानंतर पावसामुळे मॅचमध्ये व्यत्यय आला तर डकवर्थ लुईस नियमानुसार मॅचचा निर्णय घेतला जाईल. 5-5 ओव्हरची मॅच गरज पडली तर प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये ओव्हरची संख्याही कमी केली जाईल, त्यामुळे प्रत्येक टीमला कमीत कमी 5 ओव्हर बॅटिंगची संधी मिळेल. 5-5 ओव्हरच्या या सान्यात टाईम आऊट नसेल, तसंच मॅच सुरू होण्याचा कट ऑफ टाईम 11.56 असेल, मध्ये 10 मिनिटांचा ब्रेक असेल आणि मॅच रात्री 12.50 वाजता संपेल. फायनल मॅच 5-5 ओव्हरची झाली तर मॅच सुरू व्हायची जास्तीत जास्त वेळ रात्री 12.26 पर्यंत ठेवण्यात आली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022

    पुढील बातम्या