Home /News /sport /

IPL 2022 : त्यांच्यामुळेच टीम इंडियात निवड झाली, 'यॉर्कर' सिंगने या 3 खेळाडूंना दिलं श्रेय

IPL 2022 : त्यांच्यामुळेच टीम इंडियात निवड झाली, 'यॉर्कर' सिंगने या 3 खेळाडूंना दिलं श्रेय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी रविवारी टीम इंडियाची (India vs South Africa T20 Series) निवड करण्यात आली. पंजाब किंग्सचा (Punjab Kings) डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 मे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी रविवारी टीम इंडियाची (India vs South Africa T20 Series) निवड करण्यात आली. पंजाब किंग्सचा (Punjab Kings) डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. डेथ ओव्हरमध्ये अचूक यॉर्कर टाकण्याची क्षमता अर्शदीपने आयपीएलमधून दाखवून दिली, म्हणूनच त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत. पंजाब किंग्समधल्या दिग्गज बॅट्समनमुळेच आपली अचूक यॉर्कर टाकण्याची क्षमता वाढली असल्याचं अर्शदीप म्हणाला आहे. 23 वर्षांच्या अर्शदीपने आयपीएल 2022 मध्ये 7.70 च्या इकोनॉमी रेटने 10 विकेट घेतल्या. रविवारी सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल लीग स्टेजचा शेवटचा सामना सुरू व्हायच्या आधी अर्शदीपला ही आनंदाची बातमी मिळाली. पंजाब किंग्सने हैदराबादविरुद्ध 5 विकेटने विजय मिळवला. यानंतर पंजाबचा खेळाडू हरप्रीत ब्रारसोबत बोलताना अर्शदीपने त्याच्या भारतीय टीममध्ये झालेल्या निवडीवर प्रतिक्रिया दिली. 'मॅच सुरू व्हायच्या आधी मला भारतीय टीममध्ये निवड झाल्याचं कळालं. मॅच होणार होती, त्यामुळे मला फार काही जाणवलं नाही, पण हा खूप खास क्षण आहे. मी भाग्यवान आहे, भारताकडून खेळतानाही अशीच कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल,' असं अर्शदीप म्हणाला. मागच्या वर्षी टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर गेली तेव्हा अर्शदीप भारतीय टीमसोबत नेट बॉलर म्हणून गेला होता. 'पंजाब किंग्समध्ये जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow), शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) यांच्यासारख्या दिग्गज बॅट्समनना नेटमध्ये बॉलिंग केल्यामुळेच मला अचूक यॉर्कर टाकायला मदत मिळाली. याचं श्रेय टीम मॅनेजमेंटलाही जातं, ज्यांनी असे बॅट्समन निवडले. या बॅट्समनना यॉर्कर टाकणं हा एकमेव पर्याय असतो, यामुळेच माझ्या यॉर्कर टाकण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा झाली,' असं अर्शदीपने सांगितलं. दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडिया केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Punjab kings, Team india

    पुढील बातम्या