जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही, मुंबईच्या महापौर पालिका प्रशासनावर नाराज

कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही, मुंबईच्या महापौर पालिका प्रशासनावर नाराज

कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही, मुंबईच्या महापौर पालिका प्रशासनावर नाराज

‘मी निमंत्रण मिळण्याची वाट पाहत नाही, पण कदाचित प्रशासनातील अधिकाऱ्यांना महापौर यांना माहिती द्यायला वेळ नाही’

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 मे: राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) या ना त्या मुद्यावरून सत्ताधारी शिवसेना (Shivsena) आणि प्रशासनात वाद घडत असतात. आताही महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना दोन कार्यक्रमांना प्रशासनाने बोलावले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापौरांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाच महापालिकेच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच नसल्याची बाबसमोर आली आहे.  सलग दोन कार्यक्रमात असा गोंधळ दिसून आला आहे. सोमवारी नेस्को सेंटरमध्ये 150 आयसीयू खाटा आणि आजचा कोहिनूर सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण, या दोन्ही कार्यक्रमाला महापौर यांना बोलावण्यात आलेलं नव्हतं. निवृत्तीनंतर खात्रीशीर नियमित उत्पन्न हवंय? जाणून घ्या नव्या पेन्शन प्लानविषयी.. ‘मी निमंत्रण मिळण्याची वाट पाहत नाही, पण कदाचित प्रशासनातील अधिकाऱ्यांना महापौर यांना माहिती द्यायला वेळ नाही’, असा टोला लगावत महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. ‘ICMR ने सांगितली माहिती हे मुंबईकरांचे कौतुक आहे. त्यांनी नियमाचे पालन केलं महापालिका प्रशासन, राज्य सरकार यांनी उत्तम काम केले आहे.  आम्ही लहान मुलांसाठी वेगळे वॉर्ड तयार करत आहोत. त्यांच्यासाठी आयसीयू, पाळणाघर सुद्ध सुरू करणार आहोत, अशी माहितीही पेडणेकर यांनी दिली. स्मार्ट शहर नव्हे Smart Village, या गावात आता एकही कोरोना रुग्ण नाही! ‘जे लोकं राजकारण करतात त्यांनी राजकारण करू नये, कारण जनता सगळं पाहत आहे. ती योग्य वेळी याचे उत्तर देतील. तुम्हाला मुंबईची इतकी काळजी  आहे तर आपण एकत्रित आंदोलन करूया. माझ्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याने काही होणार नाही. त्यापेक्षा आपण दिल्लीला जाऊ या आणि मुंबई आणि महाराष्ट्रासाठी जास्त लस आणुया’, असा टोलाही पेडणेकर यांनी भाजपला लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात