स्मार्ट शहर नव्हे Smart Village, महाराष्ट्रातील 'या' गावात आता एकही कोरोना रुग्ण नाही!

स्मार्ट शहर नव्हे Smart Village, महाराष्ट्रातील 'या' गावात आता एकही कोरोना रुग्ण नाही!

ग्रामपंचायतीच्या या विशेष कामगिरीमुळे भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी ग्रामपंचायतीला 24 हजाराचे रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले आहे.

  • Share this:

इम्तियाज अली, प्रतिनिधी

जळगाव, 04 मे: राज्याला कोरोनाचा (Corona) विळखा बसला आहे. मुंबई, पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. पण, जळगावमधील (Jalgaon) भुसावळ येथील हॉटस्पॉट असलेल्या गावाने कोरोनावर मात केली आहे. तब्बल एक महिना उलटून गेला आहे, पण आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही.

फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू झाला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरालगत असलेल्या साकेगावमध्ये कोरोना रुग्णांचा उद्रेक पाहायला मिळाला. मार्च महिन्यामध्ये 107 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे साकेगावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. गावातील नागरिक कुणीही टेस्ट करण्यासाठी पुढे येत नव्हते, गावातील 80 टक्के नागरिक आजारी पडले होते. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर,यांनी तात्काळ घरोघरी जाऊन कोरोना रुग्णांचे सर्वेक्षण केले.

IPL 2021: आणखी एक सामना होणार रद्द?कोरोनामुळे RR विरोधात खेळण्यास CSK तयार नाही

जे रुग्ण पॉझिटिव्ह येतील अशांना गावातच विलगीकरण कक्ष सुरू करून भरती केले, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्या ठिकाणी छोटे छोटे कंटेनमेंट घेऊन तयार करण्यात आले. ज्या रुग्णांना लक्षणे आढळून येत होते अशांना त्वरित उपचार करून विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले व गावाबाहेरून येणाऱ्या व्यक्तींचा प्रवेश बंद करण्यात आला.

या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता व फवारणी कडे लक्ष देण्यात आले, उपसरपंच आनंद ठाकरे यांनी स्वतः गावामध्ये स्पीकर वरून कोरोना विषयी मार्गदर्शन देण्याचे काम केले. त्याच बरोबर का ग्रामपंचायतीच्या वतीने गावांमध्ये महाआरोग्य शिबिर ही घेण्यात आले, गावातील प्रत्येक चौकांमध्ये स्वच्छ हात धुण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे.

देशात लाखातील एक हजार कोरोना रुग्णांचा जातोय बळी, पॉझिटिव्हिटी रेट भयंकर वाढला

प्रशासनाच्या वतीने ज्या गाईडलाईन्स मिळत गेल्या त्या गाईडलाईन्सचा उपयोग केल्यामुळे आज साकेगाव मध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. स्मार्ट व्हिलेज असणाऱ्या या गावाची आठ हजार लोकसंख्या असून साकेगाव आज कोरोना मुक्त झाले आहे. ग्रामपंचायतीच्या या विशेष कामगिरीमुळे भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी ग्रामपंचायतीला 24 हजाराचे रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले आहे.

Published by: sachin Salve
First published: May 4, 2021, 11:36 AM IST
Tags:

ताज्या बातम्या