Home /News /money /

निवृत्तीनंतर खात्रीशीर नियमित उत्पन्न हवंय? जाणून घ्या नव्या पेन्शन प्लानविषयी...

निवृत्तीनंतर खात्रीशीर नियमित उत्पन्न हवंय? जाणून घ्या नव्या पेन्शन प्लानविषयी...

तुम्हाला खात्रीशीर नियमित उत्पन्नासाठी रिटायरमेंट फंडात गुंतवणूक करायची आहे का? त्यासाठी तुम्ही नव्या सरल पेन्शन प्लॅनचा विचार करू शकता.

    मुंबई, 4 मे: तुम्हाला खात्रीशीर नियमित उत्पन्नासाठी रिटायरमेंट फंडात गुंतवणूक करायची आहे कात्यासाठी तुम्ही नव्या सरल पेन्शन प्लॅनचा विचार करू शकता. विमा नियामक यंत्रणेने 1 एप्रिलपासून सिंगल प्रीमिअमनॉन-लिंक्डनॉन-पार्टिसिपेटिंग इमिजिएट अॅन्युइटी प्लॅन (Annuity Plan) सादर करण्यास सांगितलं होतं. इन्शुरन्स कंपनीचा हा प्लान परफॉर्मन्स किंवा शेअर बाजारातल्या घडामोडी यांवर अवलंबून नसलेला आहे. एजीस फेडरल लाइफ इन्शुरन्स (Ageas Federal Life Insurance) ही सरल पेन्शन प्लॅन (Saral Pension Plan) सादर करणारी लेटेस्ट इन्शुरन्स कंपनी आहे. या कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि प्रॉडक्ट्स विभागाचे प्रमुख कार्तिक रमण यांनी सांगितलं, 'रिटायरमेंटच्या वेळी तुम्ही कामातून निवृत्त झालाततरी घर चालवणं काही चुकत नाही. शिवाय त्या वयात वैद्यकीय खर्चही मोठा असतो. म्हणून निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळणं अत्यावश्यक आहे. एजीस फेडरल लाइफ इन्शुरन्स सरल पेन्शन प्लॅन ही आमची नवी योजना ही गरज पाहून तयार करण्यात आली आहे.' सरल पेन्शन योजनेत इन्शुरन्स कंपनी सिंगल लाइफ आणि जॉइंट लाइफ इमिजिएट अॅन्युइटी विथ रिटर्न ऑफ प्रिमिअम ही सुविधा देते. पॉलिसी धारकांना 100 टक्के खरेदी किमतीसह लाइफ अॅन्युइटी (Life Annuity) मिळू शकते आणि पेन्शन (Pension) आयुष्यभर दिलं जातं. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनीला परतावा मिळतो. दुसरा पर्याय आहे जॉइंट लाइफ अॅन्युइटी. यात दोघांपैकी शेवटच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 100टक्के खरेदी किमतीचा परतावा मिळतो. पहिल्या पॉलिसीधारकाला त्याच्या मृत्यूपर्यंत आणि नंतर त्याच्या जोडीदाराला त्याच्या/तिच्या मृत्यूपर्यंत पेन्शन मिळत राहतं. दोघांच्याही मृत्यूनंतर खरेदी किंमत नॉमिनीला परत मिळते. या प्लानसाठी किमान वयोमर्यादा 40 तर कमाल वयोमर्यादा 80 वर्षं आहे. अॅन्युइटी रक्कम इन्शुरन्स कंपनीकडून तिमाहीसहामाही किंवा वार्षिक तत्त्वावर मिळू शकते. अॅन्युइटीची किमान रक्कम एक हजार रुपये प्रति महिनातीन हजार रुपये प्रति तिमाहीसहा हजार रुपये प्रति सहामाही किंवा 12 हजार रुपये प्रतिवर्ष अशी असू शकते. सरल पेन्शन प्लानच्या समोर गुंतवणूकदाराला कर्ज घेता येऊ शकतं. गंभीर आजारपणाचं निदान झाल्यासपॉलिसीधारक सहा महिन्यांनंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो. अशा स्थितीत कंपनी खरेदी किमतीच्या 95 टक्के रक्कम पॉलिसी धारकाला परत करते. इन्कम टॅक्स कायद्यानुसारपेन्शनची रक्कम करपात्र (Taxable)असतेहे लक्षात घ्यावं. 'विमानियामक यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली सरल पेन्शन प्लॅन सादर करण्यास आम्हाला आनंद होतो आहे. आमच्या ग्राहकांना निवृत्तीनंतरच्या प्लानिंगसाठी अत्यावश्यक असलेलं हे प्रॉडक्ट आहे,' असं कार्तिक रमण (Karthik Raman)यांनी सांगितलं.
    First published:

    Tags: Investment, Money

    पुढील बातम्या