महाआघाडीत All is Well नाही, शिवसेनेची काँग्रस आणि राष्ट्रवादीवर दबावाची खेळी?

महाआघाडीत All is Well नाही, शिवसेनेची काँग्रस आणि राष्ट्रवादीवर दबावाची खेळी?

राऊत-फडणवीस भेटीमुळे शिवसेनेने अचुक टायमिंग साधलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

  • Share this:

मुंबई 26 सप्टेंबर: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीत सध्या महामंडळाच्या वाटपावर चर्चा सुरू आहे. यात जोरदार रस्सीखेच होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आघाडीत सर्वच काही आलबेल नाही असं बोललं जात आहे. राऊतांनी फडणवीसांची भेट घेऊन दबावाची खेळी खेळली असावी असा अंदाज राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या तीनही पक्षांमध्ये महामंडळाच्या वाटपावरून चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महत्त्वाच्या महामंडळांवर दावा केला आहे. तर शिवसेनेलाही महत्त्वाची महामंडळं पाहिजे आहेत. सत्तेत राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. आपली कामे होत नाही अशी नाराजी शिवसेनेत आहे.

तर मंत्रिमंडळात जडजोड करावी लागल्याने आता महामंडळाचं वाटप करताना काँग्रेसने प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. या मतभेदांमुळेच शुक्रवारी झालेली बैठक अर्धवट सोडावी लागली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्रात पक्षामध्ये मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

त्यामुळे राऊत-फडणवीस भेटीमुळे शिवसेनेने अचुक टायमिंग साधलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत, भाजपचे जेष्ठ नेते आहेत. राज्यतील दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं म्हणजे अपराध नाहीये. मुळात ती गुप्त भेट नव्हती, जाहीरपणे आम्ही भेटलो. जेंव्हा शरद पवार यांची ‘सामना’साठी मुलखात झाली तेंव्हा मी जाहीर केले होते की देवेंद्र फडणवीस यांची मुलखात घेईल. ‘सामाना’च्या मुलखातीसाठी आम्ही भेटलो. राहुल गांधी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती घेणार असं मी जाहीर केलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 26, 2020, 9:25 PM IST

ताज्या बातम्या