Home /News /mumbai /

एकाही बंडखोराची डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत नव्हती - आदित्य ठाकरे

एकाही बंडखोराची डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत नव्हती - आदित्य ठाकरे

 'आम्ही शिवसेना म्हणून इथं आलो आहे. शिवसेना म्हणूनच काम करणार आहोत. आम्हाला काही राक्षसी महत्वाकांक्षा नाही.

'आम्ही शिवसेना म्हणून इथं आलो आहे. शिवसेना म्हणूनच काम करणार आहोत. आम्हाला काही राक्षसी महत्वाकांक्षा नाही.

'आम्ही शिवसेना म्हणून इथं आलो आहे. शिवसेना म्हणूनच काम करणार आहोत. आम्हाला काही राक्षसी महत्वाकांक्षा नाही.

    मुंबई, 03 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे.  पण सभागृहामध्ये एकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत केली नाही. ते जरी पास झाले असले तरी नैतिकतेच्या चाचणीत नापास झाले आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya thackery) यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी शिवसेनेत बंड पुकारून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. आज पहिल्यांदाच बंडखोर आमदार आणि शिवसेनेचे नेते आमनेसामने आले. सभागृहात आदित्य ठाकरे हजर होते. पण त्यांच्याशीही एकाही बंडखोर आमदाराने बोलण्याची हिंमत केली आहे. , आमदारांनी व्हीप मोडला आहे. आम्ही सभागृहामध्ये पत्र पटलावर आणले आहे. त्यावर योग्य ती कारवाई होईलच. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांची नैतिकतेची चाचणी घ्यायची होती. एकाही बंडखोर आमदाराने डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत केली नाही. आज आमच्याकडे पाहून डोळे चोरले आहे. उद्या मतदारसंघामध्ये जाल तेव्हा शिवसैनिकांना काय तोंड दाखवाल, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. (VIDEO : ...आणि कार्यकर्त्याच्या लग्नात दानवे बनले मामा, हाती घेतला अंतरपाट) 'आम्ही शिवसेना म्हणून इथं आलो आहे. शिवसेना म्हणूनच काम करणार आहोत. आम्हाला काही राक्षसी महत्वाकांक्षा नाही. त्यांनी वेगवेगळी उपमा दिली, हॉटेल, चॉर्टर प्लेन, त्याचा खर्च कुठून झाला हे आम्हाला माहिती नाही' असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 'एखाद्या अतिरेक्याला सुद्धा असं आणलं जात नाही. कसाबच्या  वेळीसुद्धा एवढी सुरक्षा नव्हती. इतकी भीती कशाची होती. काय कुणी पळून जाणार होतं का?  विधानभवनात आमदार हा सर्वात जास्त सुरक्षित असतो. पण इथंही कडक सुरक्षा लावण्यात आली आहे. आम्ही काही आमदार गुवाहाटीला पळवून नेणार नाही. कसाबच्या वेळी सुद्धा इतकी सुरक्षा नव्हती, असं टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. 'आज आरेच्या जंगलामध्ये आंदोलन केले जात आहे. मीही त्या आंदोलनाला जाणार होतो. पण, अधिवेशन असल्यामुळे मला जाता आले नाही. पण, सरकारला माझी विनंती आहे की, आमच्यावर असलेला राग  मुंबईवर काढू नका, आम्हाला धोका दिला, पण आता मुंबईला धोका देऊ नका. आरेची जागा ही कांजूरमार्ग हा पर्याय दिला आहे. त्याच्यावर काम सुरू आहे. सत्तेवर आल्यावर प्रत्येक जण हे आप-आपला विचार करत असतो. पण मुंबईचा विचार करा. मुंबईचा विचार करण्याची गरज आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. (बाजारात Photo QR ची एन्ट्री! ही पेमेंट सुविधा नाही तर व्यवसाय वाढवण्याची ट्रीक) 'पक्ष कार्यालयाची चावी ही आमच्याकडे आहे. आम्ही तर कार्यालय सील केलं. त्यांनी तर आमचे आमदार सील केले आहे. आज अध्यक्षपदाची निवड होईल. आमच्यासोबत किती आणि त्यांच्याकडे किती आमदार आहे. आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक शिवसैनिक आहे राजन साळवी आणि दुसरा माजी शिवसैनिक आहे. मग शिवसेनेला काय मिळालं? असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या