मराठी बातम्या /बातम्या /मनी /बाजारात आता Photo QR ची एन्ट्री! ही फक्त पेमेंट सुविधा नाही तर व्यवसाय वाढवण्याची ट्रीक

बाजारात आता Photo QR ची एन्ट्री! ही फक्त पेमेंट सुविधा नाही तर व्यवसाय वाढवण्याची ट्रीक

पेटीएमचे नवीन फोटो क्यूआर (Photo QR) अनेक नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. हे QR कोडचे जग पूर्णपणे बदलू शकते. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि ते तुमच्या व्यवसायासाठी कसे सोयीचे आहे, हे समजून घेऊया.

पेटीएमचे नवीन फोटो क्यूआर (Photo QR) अनेक नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. हे QR कोडचे जग पूर्णपणे बदलू शकते. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि ते तुमच्या व्यवसायासाठी कसे सोयीचे आहे, हे समजून घेऊया.

पेटीएमचे नवीन फोटो क्यूआर (Photo QR) अनेक नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. हे QR कोडचे जग पूर्णपणे बदलू शकते. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि ते तुमच्या व्यवसायासाठी कसे सोयीचे आहे, हे समजून घेऊया.

नवी दिल्ली, 3 जुलै : डिजिटायझेशनमुळे पेमेंट सुविधा पूर्वीपेक्षा खूपच सोप्या झाल्या आहेत. तुम्ही प्रत्येक लहान किंवा मोठ्या दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी QR कोडद्वारे पेमेंट सुविधा पाहू शकता. तुम्ही एखाद्या मोठ्या मॉलच्या आलिशान शोरूममध्ये खरेदी करत असाल किंवा रस्त्याच्या कडेला पाणीपुरी खात असाल, QR पेमेंटची सुविधा सहज उपलब्ध असते. डिजिटल पेमेंट आता सामान्य झाले आहे आणि ते आपल्या सर्वांच्या सवयीमध्ये समाविष्ट झाले आहे. कधीकधी अनेक QR कोडमुळे तुम्हीही गोंधळत असाल तर आता ही अडचण देखील दूर होणार आहे. QR कोडचे जग पूर्णपणे बदलणार आहे, त्यानंतर तुम्हाला सर्वोत्तम अनुभव मिळेल याची खात्री आहे. आता फोटो QR द्वारे QR पेमेंटचे नवीन युग सुरू झाले आहे. क्यूआर कोडच्या नवीन वैशिष्ट्याशी संबंधित सर्व माहिती तुम्हाला आजच्या लेखातून मिळेल.

Photo QR म्हणजे काय, आधी हे जाणून घ्या

Paytm च्या सर्वात अद्वितीय आणि सर्वोत्तम वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे फोटो क्यूआर. 20 लाखांहून अधिक व्यवसाय मालक सध्या हे वैशिष्ट्य वापरत आहेत. सामान्य QR ची नवीन आणि सुधारित आवृत्ती म्हणजे Photo QR आहे. हे वैशिष्ट्य व्यवसाय मालकांना त्यांचे QR त्यांच्या आवडीनुसार करण्यास अनुमती देते.

व्यवसाय मालक त्यांच्या QR मध्ये आता त्यांच्या आवडीचा फोटो जोडू शकतात. शिवाय, दुकानाचे नाव आणि फोन नंबर देखील फोटो QR मध्ये समाविष्ट करता येतो. तुमचा व्यवसाय ग्राहकांशी जोडण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. फोटो QR या बाबतीत खास आहे. कारण, त्यात सामान्य QR ची सर्व वैशिष्ट्ये आहेत आणि काही भिन्न उत्कृष्ट वैशिष्ट्ये देखील जोडण्यात आली आहेत.

Photo QR वापरण्यास अतिशय सोपे

आवडीनुसार पूर्णपणे वेगळा QR कोड तयार करण्यासाठी फोटो QR एकच फोटो वापरतो. व्यवसाय मालक यासाठी त्यांचा स्वतःचा फोटो निवडू शकतात. जसे की तो तुमचा सेल्फी, ब्रँड लोगो किंवा तुमच्या फोन गॅलरीत आधीपासून सेव्ह केलेले कोणतोही फोटो असू शकते. तसेच, तुम्ही Paytm for Business अॅप गॅलरीमधील फोटो QR कस्टमायझेशन पेजवरील सुंदर फोटोंमधून देखील निवडू शकता. यामध्ये उत्सवांचे फोटो, ऐतिहासिक वास्तूंचा समावेश आहे.

व्यापाऱ्याला प्रथम त्याचा आवडता फोटो वापरून स्वत:चा Photo QR तयार करावा लागतो. फोटो QR तयार झाल्यानंतर, व्यापारी त्याची डिजिटल प्रत डाउनलोड करू शकतात आणि त्यांच्या ग्राहकांसोबत शेअर करू शकतात. ती डिजिटल कॉपी स्कॅन करून ग्राहक पेमेंट करू शकतात. याशिवाय व्यापारी स्टिकर्स आणि फोटो क्यूआर स्टँड देखील ऑर्डर करू शकतात, जे दुकानात लावले जाऊ शकतात आणि पेमेंट घेऊ शकतात.

तुम्ही Photo QR का वापरावा?

फोटो QR वापरण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते पेमेंटद्वारे तुमच्या व्यवसायाला पर्सनल टच देते. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Photo QR साठी तुम्हाला हवे असलेले कोणताही फोटो तुम्ही निवडू शकता. तुमचा मजेदार सेल्फी असो, ब्रँड लोगो असो, प्रसिद्ध इमारती असोत किंवा एखादा सण असो. तुम्ही तुमच्या फोन गॅलरी आणि Paytm for Business अॅपमधील अनेक सुंदर फोटोंमधून तुमचा आवडता फोटो निवडू शकता.

चांगला ग्राहक अनुभव

Photo QR ही व्यवसाय मालकांसाठी त्यांच्या ग्राहकांपर्यंत ब्रँड पोहोचवण्याची आणि त्यांच्याशी विशेष नाते निर्माण करण्याची सुवर्ण संधी आहे. सामान्य QR कोडप्रमाणे ही केवळ पेमेंटची पद्धत नाही. यासोबत आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे बिझनेस वाढवण्यासोबतच ग्राहकांना चांगला अनुभवही मिळतो. फोटो क्यूआर वापरणारे ग्राहकही पूर्णपणे समाधानी होतात. ग्राहकांनी योग्य QR कोडवर पैसे भरले आहेत की नाही, याबाबत ग्राहकांच्या मनात कोणतीही शंका राहत नाही.

Photo QR मिळवण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या

Photo QR ऑर्डर करण्यासाठी व्यवसाय मालकांना जास्त काही करावे लागत नाही. हे खूप सोपे आहे. यासाठी पेटीएम फॉर बिझनेस अॅप ओपन करा. होमपेजवर दिसणार्‍या Photo QR आयकॉनवर क्लिक करा. QR मध्ये जोडण्यासाठी फोटो निवडा.

सेल्फी असो, व्यवसाय मालकाच्या फोन गॅलरीमध्ये सेव्ह केलेला फोटो असो किंवा गॅलरीत सेव्ह केलेला फोटो असो, तुम्ही 'पेज कस्टमाइझ करा' विभागात ते निवडू शकता. त्यातून तुमचे आवडता फोटो निवडा आणि पुढील चरणावर जा.

सहज ट्रॅक करता येतो

फोटो निवडल्यानंतर, व्यवसाय मालकाने पत्ता प्रविष्ट करणे आवश्यक आहे. यानंतर, शेवटच्या टप्प्यात, तुम्हाला Photo QR ऑर्डर करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. पेमेंट केल्यानंतर, फोटो QR ऑर्डर दिली जाते. यानंतर, तुम्ही पेटीएमच्या बिझनेस अॅपवर तुमची ऑर्डर तपासू शकता आणि घरी पोहोचण्यापूर्वी ते सहजपणे ट्रॅक करू शकता.

सर्वत्र वापरला जाणारा QR आता जुना आणि खूप कंटाळवाणा झाला आहे. Photo QR सह, तुम्हाला सामान्य QR वापरून मिळणारे सर्व फायदे मिळत राहतील. तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी फोटो क्यूआर ही देखील एक चांगली सुविधा आहे आणि तुम्हाला यात कोणतीही अडचण येणार नाही. हे वैशिष्ट्य तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढविण्यात कशी मदत करू शकते ते येथे पहा.

First published:

Tags: Paytm, QR code payment