मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...आणि कार्यकर्त्याच्या लग्नात दानवे बनले मामा, हाती घेतला अंतरपाट, Exclusive व्हिडिओ News18 लोकमतच्या हाती

...आणि कार्यकर्त्याच्या लग्नात दानवे बनले मामा, हाती घेतला अंतरपाट, Exclusive व्हिडिओ News18 लोकमतच्या हाती

आपल्या वक्तव्य आणि कृतीमुळे सदैव चर्चेत राहणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची आणखीन एक कृती चर्चेत आली आहे.

आपल्या वक्तव्य आणि कृतीमुळे सदैव चर्चेत राहणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची आणखीन एक कृती चर्चेत आली आहे.

आपल्या वक्तव्य आणि कृतीमुळे सदैव चर्चेत राहणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची आणखीन एक कृती चर्चेत आली आहे.

जालना, 3 जून : आपल्या वक्तव्य आणि कृतीमुळे सदैव चर्चेत राहणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे (Raosaheb Danve) यांची आणखीन एक कृती चर्चेत आली आहे. दानवेंनी यावेळी आपल्या कार्यकर्त्याच्या लग्न समारंभात नुकतीच हजेरी नाही लावली तर चक्क मंगलाष्टकाच्यावेळी अंतरपाट देखील धरला. भोकरदन तालुक्यातील वराडे आणि पाचरणे या दोन्ही कुटुंबियांच्या आनंदाच्या क्षणात रावसाहेब दानवे सहभागी झाले. हा विवाह सोहळा भोकरदनमध्ये पार पडला. दानवे यांचा अंतरपाट धरलेला हा Exclusive व्हिडिओ News 18 लोकमतच्या हाती लागलाय.

केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दिलखुलास असा स्वभाव आहे. त्यांच्या स्वभावामुळे जालना जिल्ह्यात, तसेच महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे. ग्रामीण भागातील अनेक तरुण दानवे यांच्यावर प्रेम करतात, त्यांचा आदर करतात. विशेष म्हणजे दानवे हे देखील आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतात. त्यांचं कार्यकर्त्यांसोबत असणारं नातं आजच्या विवाहाच्या निमित्ताने उघडपणे जगजाहीर झालं आहे.

भारत देशाचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आपल्या पदाचा गर्व न बाळगता सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या लग्नात मंगलाष्टकाच्यावेळी अंतरपाट पकडतो या गोष्टीचं लग्नात जमलेल्या पाहुणे मंडळींनाही अप्रुप वाटलं. दानवेंनी फक्त कार्यकर्ताच नाही तर लग्नात आलेल्या प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केलं.

(फडणवीसांच्या कानात सांगितलेलं तसं झालं असतं तर आज...,आदित्य ठाकरे अखेर बोलले)

रावसाहेब दानवे यांच्याबद्दल भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये देखील आदर आहे. गेल्यावर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यावेळी प्रकाश जावडेकर यांच्या सारखे दिग्गज नेत्यांना आपल्या मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. विशेष म्हणजे त्यावेळी रावसाहेब दानवे यांनादेखील मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागेल, अशी चर्चा रंगली होती. संबंधित चर्चा ही फक्त सर्वसामान्य किंवा त्यांच्या पक्षातच नाही तर विरोधी पक्षाच्या गोटातही रंगली होती. पण भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीने रावसाहबे दानवे यांच्या पाठिमागे कार्यकर्त्यांचा असलेल्या पाठिंब्याचा आणि लोकप्रियतेचा वलय याचा विचार केला आणि दानवे यांना थेट केंद्रीय रेल्वेराज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. भाजपच्या या निर्णयामुळे विरोधकांना धक्का बसला होता. पण दानवे यांनी चांगलाच विजय मिळवला होता. दानवे नेहमी त्यांच्या विविध वक्तव्यांसाठी चर्चेत येतात. आता तर त्यांनी कार्यकर्त्याच्या लग्नात हजर राहून अनोखी कृती करुन कार्यकर्त्यांच्या मनात आणखी आदराचं स्थान निर्माण केल्याची भावना काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

First published:

Tags: BJP, Raosaheb Danve