जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीच! शिंदेंनी सोपवली इतर मंत्र्यांवर जबाबदारी

अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीच! शिंदेंनी सोपवली इतर मंत्र्यांवर जबाबदारी

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः कडील खात्यांचे अधिवेशनासाठी इतर मंत्र्यांना तात्पुरते वाटप केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः कडील खात्यांचे अधिवेशनासाठी इतर मंत्र्यांना तात्पुरते वाटप केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः कडील खात्यांचे अधिवेशनासाठी इतर मंत्र्यांना तात्पुरते वाटप केले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 डिसेंबर : शिंदे सरकार स्थापन होऊन आता पाच महिने पूर्ण होत आहे. पण अजूनही दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काही केला सापडत नाही. आता हिवाळी अधिवेशनाच्या आधीही विस्तार लांबणीवर पडला आहे. अधिवेशनात उत्तरं देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील खात्यांची जबाबदारी ही इतर नेत्यांवर सोपवली आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा केला. सरकार स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळाचा जम्बो विस्तार होईल अशी अपेक्षा होती. पण, मोठ्या प्रतिक्षेनंतर 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. आता हिवाळी अधिवेशनाच्या अधिवेशनाच्या तोंडावर विस्तार होईल अशी शक्यता होती, पण ती शक्यता आताही लांबणीवर पडली आहे. (‘तुम्ही कोणालाही भेटा…,’ कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा शिंदे सरकारला पुन्हा थेट इशारा) हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः कडील खात्यांचे अधिवेशनासाठी इतर मंत्र्यांना तात्पुरते वाटप केले आहे. उदय सामंत, शंभूराजे देसाई, दादा भुसे, संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, संदिपान भुमरे आणि गुलाबराव पाटील यांच्याकडे इतर खात्यांची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी या मंत्र्यांना सामोरं जावं लागणार आहे. (  CM एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् बोम्मईंचं लगेच ट्विट! पण, शेवटच्या वाक्यात सीमावादावर मोठं भाष्य ) नाराज आमदारांना महामंडळं मिळणार? दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महामंडळाच्या वाटपाबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये नवी फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली. या बैठकीमध्ये शिंदे गटापेक्षा अधिकचे महामंडळ भाजपच्या वाट्याला येणार आहे. हिवाळी अधिवेशनानंतर याबद्दल घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्या आमदारांना मंत्रिपद मिळालेले नाही, अशांची नाराजी दूर करण्यासाठी महामंडळाचं वाटप केले जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात