मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुलांसोबत लोकलने प्रवास करण्यास महिलांना मनाई, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

मुलांसोबत लोकलने प्रवास करण्यास महिलांना मनाई, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

दररोज लाखो महिला लोकलने प्रवास करत आहे.  यात काही महिला या आपल्या लहान मुलांना सुद्धा सोबत घेऊन प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.

दररोज लाखो महिला लोकलने प्रवास करत आहे. यात काही महिला या आपल्या लहान मुलांना सुद्धा सोबत घेऊन प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.

दररोज लाखो महिला लोकलने प्रवास करत आहे. यात काही महिला या आपल्या लहान मुलांना सुद्धा सोबत घेऊन प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 27 नोव्हेंबर : लॉकडाउनमुळे (Lockdown) सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा (Mumbai Local) अद्याप बंदच आहे. मात्र, महिलांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, लहान मुलांसोबत प्रवास करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे रेल्वे विभागाने आता मुलांसोबत प्रवास करण्यास मनाई केली आहे.

मुंबईच्या लोकलमधून महिलांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दररोज लाखो महिला लोकलने प्रवास करत आहे.  यात काही महिला या आपल्या लहान मुलांना सुद्धा सोबत घेऊन प्रवास करत आहे.  कोरोनाच्या परिस्थितीत लहान मुलांनाही  घेऊन प्रवास करत असल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

संजय राऊतच मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतात, चंद्रकांत पाटलांचा घणाघात

कोरोनाच्या परिस्थिती ही संख्या लक्षात घेता रेल्वे विभागाने आता लहान मुलांसोबत लोकलने प्रवास करण्यास मनाई केली आहे. याबद्दल एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमार्गावर हे नियम लागू करण्यात आले आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर आरपीएफ पोलीस तैनात करण्यात आले आहे. जर एखादी महिला प्रवासी जर लहान मुलांसोबत प्रवास करणार हे जर निदर्शनास आले तर त्या महिलेला मुलासोबत प्रवास करण्यापासून रोखण्यात येणार आहे. त्या महिलेला स्टेशनवरुन परत पाठवण्यात येईल, असंही रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.

VIDEO: समुद्रात गुंग होऊन पोहत होता तरुण,बाजुला होता 10 फूट भलामोठा शार्क आणि...

लोकल सेवा बंद असल्याने कामानिमित्त मुंबईच्या विविध भागात येणाऱ्या प्रवाशांचे मोठा हाल होत आहेत. त्यामुळे किमान महिलांसाठी तरी लोकल सुरू करा अशी मागणी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. पत्रव्यवहार केल्यानंतर अखेर नवरात्रीच्या उत्सवात रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी हिरवा कंदील देत महिलांना लोकल प्रवास करण्यास परवानगी दिली होती. ठरावीक वेळेत लोकलने प्रवास करण्यास महिलांना परवानगी देण्यात आली.

दरम्यान, सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा कधी सुरू होणार याबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आले नाही.

First published: