मुंबई, 5 एप्रिल : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Parambir Singh ) यांनी आरोप केल्यामुळे अखेर हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अशात अभिनेत्री कंगना रणौतने अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.
कंगना रणौत (Kangana Ranaut) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडत असते. कंगनाने 2020 मध्ये महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप लावले होते. ज्यानंतर अनिल देशमुखांनी कंगनाला येथे राहण्याचा हक्क नसल्याचंही म्हटलं आहे. आता कंगनाने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावर निशाणा साधला आहे. (Kangana Ranaut targets Anil Deshmukh after resignation)
जो साधुओं की हत्या और स्त्री का अपमान करे उसका पतन निश्चित है #AnilDesmukh यह तो सिर्फ़ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या #UddhavThackeray https://t.co/cvEZsjUxSc
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 5, 2021
हे ही वाचा-...अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का? देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
कंगनाने केलं ट्वीट
कंगनाच्या एका चाहत्याने अभिनेत्रीचा सप्टेंबर 2020 चा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. जेव्हा बीएमसीने कंगनाच्या घरात तोडफोड केली होती, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. यानंतर कंगनाने व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला होता.
आता हा व्हिडिओ एका चाहत्याने कंगनाला टॅग केला आहे. यावर कंगनाने लिहिलं आहे की, जे साधुंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतात, त्यांचा पराजय निश्चित आहे. #AnilDesmukh ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे पाहा, काय काय होतं ते. #UddhavThackeray.
अस्पष्टपणे कंगनाचं म्हणणं आहे की, तिचं अपमान करण्याची शिक्षा अनिल देशमुख यांना मिळाली आहे. कंगनाचं हे ट्वीट जलद गतीने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्स यावर प्रतिक्रिया देत आहेत.
काय आहे अनिल देशमुख यांच्यावर आरोप
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नुकताच मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांनी 100 कोटी हफ्तावसुली करण्याचा गंभीर आरोप लावला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर सुनावणी करीत या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. ज्यानंतर इतकचं नाही सीबीआयला कोर्टाने आदेश दिला आहे की, त्यांनी 15 दिवसांच्या आत प्राथमिक रिपोर्ट सादर करावा आणि त्यांच्या तपासात काही तथ्य समोर आले तर पुढील कारवाई करा.
या निर्णयानंतर अनिल देशमुखने आपला राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखसाठी खूप मोठा झटका बसला आहे. या कारणास्तव आता महाराष्ट्र सरकारच्या अडचणी वाढू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Kangana ranaut, Mumbai