मुंबई, 05 एप्रिल : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Parambir Singh ) यांनी आरोप केल्यामुळे अखेर हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पण, अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असला तरी न्यायालयीन लढाईसाठी आता मैदानात उतरले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख हे संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहे. आज रात्री उशिरा अनिल देशमुख हे दिल्लीत पोहचणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे. हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनिल देशमुख यांनी ज्येष्ठ वकिलांचा सल्लाही घेण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये नवीन गृहमंत्र्यांचा शोध सुरू झाला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारावे अशी राष्ट्रवादीच्या गोटात रंगली होती. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याआधीही गृहमंत्रिपद सांभाळले होते. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात अनुभवी अशा नेत्याकडे गृहमंत्रिपद द्यावे अशी चर्चा राष्ट्रवादीत रंगली होती. न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना दिलीप वळसे पाटील यांनी अखेर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
वळसे पाटील का?
दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेलं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार यांनी केला.
पुण्यात विकृतीचा कळस! 65 वर्षीय वॉचमनने भटक्या कुत्रीबरोबर केलं अनैसर्गिक कृत्य
यापूर्वीही विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली आणि भाजपने घेतलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले. यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.