नवी दिल्ली, 4 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये झालेला करार महत्त्वपूर्ण आहे. या करारानुसार दोन्ही देशांना एकमेकांचे सैन्य तळ वापरता येणार आहे.
हा करार म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया मैत्रीचे नवे मॉडेल असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करारानंतर केला. या बैठकीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये आरोग्य सेवा, व्यवसाय आणि संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी चर्चा केली. नव्या करारानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांची लढाऊ जहाजं आणि लढाऊ विमानं एकमेकांच्या सैन्य तळांचा वापर करू शकणार आहेत. विशेष म्हणजे गरज भासल्यास त्यांना इंधनाचा पुरवठादेखील केला जाणार आहे. हिंद महासागरातील चीनचा हस्तक्षेप वाढत आहे, तो रोखण्यासाठी दोन्ही देश एकत्र आल्याचं म्हटलं जात आहे.
India&Australia are committed to supporting a rules-based maritime order that is based on respect for sovereignty&international law, particularly the United Nations Convention on the Law of the Sea (UNCLOS): Joint declaration after PM Modi&Australian PM's virtual summit(File pic) pic.twitter.com/HnpRVNka1b
भारताने चारही बाजूंनी चीनवरील दबाव कायम ठेवल्याचा परिणाम म्हणजेच चीनची माघार आहे. चीनला त्याच भाषेत उत्तर देणं असो की ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी करून चीनला पराभूत करण्याची योजना असो, पंतप्रधान मोदींच्या निर्णायक चरणांमुळे आज चीनची वृत्ती नरम पडली आहे.
मोदींच्या भव्य योजनेमुळे जिनपिंग अपयशी ठरले!
दोन दिवसांपूर्वीपर्यंत चीन एलएसीवर युद्धअभ्यास करण्यात गुंतला होता. चीनच्या अधिकृत माध्यमांनी ती छायाचित्रे प्रसिद्ध केली होती, ज्यात चिनी सैन्य रात्रीच्या अंधारात युद्धाच्या तयारीत गुंतले होते. पण अचानक असे काय घडले ज्यामुळे सैन्याला माघार घ्यायला भाग पाडले. चीनच्या या हालचालीमागे पंतप्रधान मोदींची रणनीती आहे, जी पुन्हा एकदा सुपरहिट ठरली आहे. गुडघे टेकण्यासाठी सक्तीने अशा प्रकारे भारताने चीनला वेढले आहे.