जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / '...दुसरं काही नको, बदल्यात तुमच्या पाया पण पडू'; अजित पवारांचा तो Video शेअर करत निलेश राणेंचं ट्विट

'...दुसरं काही नको, बदल्यात तुमच्या पाया पण पडू'; अजित पवारांचा तो Video शेअर करत निलेश राणेंचं ट्विट

'...दुसरं काही नको, बदल्यात तुमच्या पाया पण पडू'; अजित पवारांचा तो Video शेअर करत निलेश राणेंचं ट्विट

अजित पवार या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतात की ‘राणेंच्या वेळेस दरारा असायचा. त्यांनी नुसतं मागे वळून बघितलं की शिवसेनेचे सगळे चिडीचूप व्हायचे’

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 05 जुलै : राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत (Maharashtra Political Updates). यादरम्यान ठाकरे सरकार कोसळून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार **(New Government in Maharashtra)**आलेलं आहे. तर, विरोधी पक्षनेतेपदी अजितदादांची निवड करण्यात आली आहे. यासाठी आभार मानण्यासाठी उभा असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर सडकून टीकाही केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना दणका, BMC मधील खास अधिकाऱ्यांची केली बदली आपल्या भाषणादरम्यान अजित पवारांनी विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणेंचाही उल्लेख केला. याचाच व्हिडिओ निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शेअर केला आहे. राणे यांचे पुत्र आणि भाजप नेते निलेश राणे यांनी हा व्हिडिओ शेअर करत अजित पवारांच्या पाया पडायलाही तयार असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतात की ‘राणेंच्या वेळेस दरारा असायचा. त्यांनी नुसतं मागे वळून बघितलं की शिवसेनेचे सगळे चिडीचूप व्हायचे. सगळे खाली बसायचे. असला दरारा मी शिवसेनेमध्ये दुसऱ्या कुणाचा बघितला नाही. मात्र राणेंनी हा दबदबा स्वत: निर्माण केलेला होता’. यावर सहमती दर्शवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मान हलवून होकार देताना दिसले.

जाहिरात

अजित पवारांचा हाच व्हिडिओ निलेश राणेंनी शेअऱ केला आहे. व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं ‘आम्हाला दुसरं काही नको. आमच्या माणसाला मानसन्मान दिलात, बदल्यात तुमच्या पाया पण पडू’. यासोबतच त्यांनी हात जोडणारा इमोजीही पोस्ट केला आहे. एकंदरीतच निलेश ऱाणेंनी अजित पवारांचे अप्रत्यक्षरित्या आभार मानले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या जागी अजित पवार - दरम्यान गेले अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता या पदावर होते तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते. मात्र, आता सरकार बदललं असल्याने देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत, तर अजित पवार यांनी फडणवीसांची जागा घेतली आहे. विरोधी पक्षनेता हे पद अतिशय ताकदीचं असतं. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता कोण असेल, याचा निर्णय घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात