जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना दणका, BMC मधील खास अधिकाऱ्यांची केली बदली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना दणका, BMC मधील खास अधिकाऱ्यांची केली बदली

 एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताच मुंबई महानगरपालिकेतील 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताच मुंबई महानगरपालिकेतील 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताच मुंबई महानगरपालिकेतील 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 जुलै :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर आता चांगलेच कामाला लागले आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले काही निर्णय आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. शिवसेनेचे (shivsena) नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांच्या जवळचे समजले जाणाऱ्या अधिकाऱ्यांची शिंदेंनी बदली केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताच मुंबई महानगरपालिकेतील 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. धारावीचे कोविड-19 संकट हाताळण्यासाठी ओळखले जाणारे सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर यांची दादर येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रभाग कार्यालयातून भायखळा येथे बदली करण्यात आली आहे. दिघावकर यांच्या जागी प्रशांत सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे सध्या पश्चिम उपनगरातील के/पूर्व (अंधेरी पूर्व, जोगेश्वरी) प्रभाग कार्यालयाचे प्रमुख आहेत. दरम्यान, सपकाळे यांच्या जागी सध्या भायखळा प्रभागाचे प्रभारी मनीष वलंजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( EV Green चं अर्धसत्य! इलेक्ट्रॉनिक कार इको फ्रेंडली नाहीत, कारण… ) दिघावकर यांनी जी/उत्तर (जी/एन) वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर म्हणून काम केले. त्यांनी दादर, माहीम आणि धारावी परिसराचा तीन वर्षे समावेश केला आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे अशी ओळख आहे. दरम्यान,  शिवसेनेचे नवे प्रतोद भरत गोगावले यांनी सोमवारी झालेल्या बहुमत चाचणीनंतर शिवसेनेच्या आमदारांवर कारवाई करण्याचं ठरवलं आहे. शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली आहे. आमचा व्हीप न पाळणाऱ्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस आम्ही दिली असल्याचं गोगावले यांनी सांगितलं. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर दाखवत त्यांनी आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव दिलेलं नाही. ( बंदुकीच्या गोळ्या आणि कुजलेला मृतदेह; महामार्गावर आढळला बेपत्ता स्टॉक ब्रोकर ) गोगावले पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आता आदित्य ठाकरे यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील. सोमवारी शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत चाचणी पास केली आहे. त्यात शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटातील आमदारांना व्हीप बजावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात