• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • घाबरला म्हणून 45 लाखांना झाला जीवाचा सौदा; मनसुख हिरेन हत्याकांडात NIAचा खळबळजनक खुलासा

घाबरला म्हणून 45 लाखांना झाला जीवाचा सौदा; मनसुख हिरेन हत्याकांडात NIAचा खळबळजनक खुलासा

Mansukh Hiren Murder: मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कोणी आणि का केली? याबाबतच काही दिवसांपासून गूढ बनलं होतं. या हत्याकांड प्रकरणात NIA ने सर्वात मोठा खुलासा केला आहे.

  • Share this:
मुंबई, 04 ऑगस्ट: मुंबईतील कार मायकल रोडवर जिलेटीनच्या स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती. मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं. पोलीस प्रशासनात सुरू असलेला गलथान कारभार देखील चव्हाट्यावर आला होता. मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कोणी आणि का केली? याबाबतच गूढ बनलं होतं. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात देखील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. पण NIA ने आता याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. सराईत गुन्हेगारांना सुपारी देऊन मनुसुख हिरेन यांची हत्या घडवून आणल्याचा खळबळजनक खुलासा NIA ने विशेष न्यायालयात केला आहे. आरोपींनी मनसुख यांची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांची सुपारी दिल्याचंही NIA ने सांगितलं आहे. कार मायकल रोडवर जिलेटीनच्या स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानंतर मनसुख हिरेन घाबरले होते. यामुळेच पुरावा नष्ट करण्यासाठी मनसुख यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा एनआयएने केला आहे. NIA च्या विशेष न्यायालयात याबाबत सुनावणी झाली आहे. हेही वाचा-बायकोनंच केला दारुड्या नवऱ्याचा खून, मित्रांना सुपारी देऊन काढला काटा नेमकं काय घडलं? 25 फेब्रुवारी रोजी मुंबईतील कार मायकल रोडवर जिलेटीन स्फोटकांनी भरलेली एक स्कार्पिओ कार सापडली होती. हिरव्या रंगाची  ही स्कार्पिओ कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. स्फोटकांनी भरलेली ही कार रस्त्यावर आढळल्यानं या घटनेचा तपास NIA ने आपल्या हाती घेतला. ही कार मनसुख हिरेन यांच्या नावावर असल्यानं हिरेन यांच्या अडचणी वाढल्या होत्या. तसेच त्यांना चौकशीसाठी अनेकदा  बोलवण्यात आलं होतं. त्यामुळे ते पूर्णपणे घाबरून गेले होते. हेही वाचा-इमारतीवरून नवजात बालिकेला फेकलं; विरारमधील क्रूरतेचा कळस गाठणारी घटना मनसुख हिरेन यांनी तोंड उघडलं तर आपलं काळबेरं बाहेर येईल, यामुळे मुख्य आरोपींनी सराईत गुन्हेगारांना सुपारी देऊन मनसुख हिरेन यांचा काटा काढला. यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह समुद्राच्या खाडीत आढळून आला होता. संबंधित हिरवी स्कॉर्पिओ आणि पांढरी इनोव्हा गाडी चालवणारे दुसरे तिसरे कोणी नसून CIU चे पोलीस असल्याची माहिती NIA ने उघड केली होती.
Published by:News18 Desk
First published: