रायपूर, 3 ऑगस्ट : दारु पिऊन त्रास (liquor addict) देणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या पतीचा (husband) पत्नीनंच (wife) खून (murder) केल्याचं समोर आलं आहे. आपल्या पतीच्या मित्रांनाच (friends) तिनं हत्येची सुपारी दिली आणि या मित्रांनी आपल्या मित्राचा पैशांसाठी खून केला. दारू पिऊन वारंवार आपल्याला आणि मुलीला होणाऱ्या मारहाणीला ही महिला वैतागली होती. त्यासाठी तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं.
असा झाला खून
छत्तीसगडमधल्या राजनांदगाव जिल्ह्यात धनेश कुमार साहू दररोज दारू पिऊन आपली पत्नी सुमरितला मारहाण करत असे. रोजच्या जाचाला कंटाळून सुमरितनं धनेशचे मित्र धर्मेंद्र, अनिल आणि उपेंद्र यांना त्याच्या हत्येची सुपारी दिली. त्यासाठी 1 लाख रुपये देण्याची तयारी सुमरितनं दाखवली. सुरुवातीला तिनं 7 हजार रुपये ऍडव्हान्सही दिले.
त्यानंतर 1 ऑगस्टला धनेश संध्याकाळी जेवण करून घराबाहेर पडला आणि परत घरी आलाच नाही. धनेशचा पुतण्या आणि इतर नातेवाईकांनी धनेश बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली आणि पोलिसांनी शोध सुरु केला. धनेश ज्या बाईकवरून गेला होता, ती बाईक एका जलाशयाशेजारी पोलिसांना सापडली. मात्र धनेशचा काहीच पत्ता लागत नव्हता. अखेर पोलिसांनी स्नीफर डॉग मागवून तपास केला. या स्नीफर डॉगनं एका कचराकुंडीपाशी काहीतरी संशयास्पद असल्याचा संकेत दिला. तिथे थोडं खोदकाम केल्यानंतर धनेशचा मृतदेह पोलिसांना सापडला.
असा लागला छडा
पोलिसांनी धनेश घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने काय केलं, याचा शोध घेतला. त्या दिवशी तो त्याच्या तीन मित्रांना भेटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तीन मित्रांना अटक करून त्यांच्याकडे विचारपूस केली, तेव्हा पोलिसांचा संशय बळावला. आपण दारू आणि तंबाखु देण्यासाठी धनेशकडे गेलो असल्याचं मित्रांनी पोलिसांना सांगितलं. मात्र पोलीस खाक्या दाखवताच मित्रांनी तोंड उघडलं आणि हत्येची कबुली दिली.
हे वाचा -लालूपुत्राला म्हणे दिसतं भूत; तेजप्रताप घेतात महादेवाचं नाव
पोलिसांनी धनेशच्या पत्नीसह तीन मित्रांना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Murder, Wife and husband