कानपूर, 27 नोव्हेंबर: कानपूर टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा संघर्ष सुरू आहे. सकाळच्या सत्रात झटपट विकेट्स घेऊन न्यूझीलंडला बॅकफुटवर ढकलण्याची टीम इंडियाची योजना यशस्वी झाली नाही. भारताकडून आर. अश्विननं (R. Ashwin) सकाळच्या सत्रात पहिली विकेट घेतली. त्यानं विल यंगला (Will Young) 89 रनवर आऊट केले.अश्विनला ही विकेट मिळण्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) खास माणसानं मोलाची मदत केली.
त्यापूर्वी तिसऱ्या दिवशी सकाळी टीम इंडियाला एक धक्का बसला. ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) विकेट किपिंगसाठी मैदानात उतरला नाही. साहाची मान दुखावली असून त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. साहाच्या अनुपस्थितीमध्ये केएस भरत (KS Bharat) विकेट किपिंग करण्यासाठी मैदानात उतरला आहे. भरतनं आयपीएल 2021 मध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील सीरिजमध्ये ऋषभ पंतला (Rishabh Pant) विश्रांती देण्यात आली आहे. तर ऋद्धीमान साहाची मुख्य विकेट किपर म्हणून निवड करण्यात आली असून त्याला बॅकअप म्हणून भरतचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. साहा फिट नसल्यानं तिसऱ्या दिवशी भरतला मैदानात उतरावे लागले.
UPDATE - Wriddhiman Saha has stiffness in his neck. The BCCI medical team is treating him and monitoring his progress. KS Bharat will be keeping wickets in his absence.#INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) November 27, 2021
साहानं केला विक्रम
कानपूर टेस्टमध्ये मैदानात उतरण्यापूर्वीच टीम इंडियाचा ऋद्धीमान साहाने एक मोठा विक्रम केला केला आहे. गेल्या 75 वर्षात कोणत्याही भारतीयाला न जमलेली कामगिरी त्यानं केली आहे.ऋद्धीमान साहा 1946 नंतर टीम इंडियाकडून टेस्ट मॅच खेळणारा सर्वात ज्येष्ठ विकेट किपर बनला आहे. साहाचं वय सध्या 37 वर्ष 32 दिवस आहे. त्यानं कानपूर टेस्टमध्ये माजी भारतीय विकेट किपर फारूख इंजिनिअर यांना मागे टाकलं आहे. इंजिनिअर यांनी 36 वर्ष 338 दिवस वय असताना टीम इंडियाकडून टेस्ट मॅचमध्ये विकेट किपिंग केली होती.
IND vs NZ: श्रेयस अय्यरच्या बहिणीचीही भावाइतकीच चर्चा, वाचा कोणत्या क्षेत्रात आहे प्रसिद्ध
भारताकडून सर्वाधिक वयामध्ये विकेट किपिंग करण्याचा रेकॉर्ड दत्ताराम हिंदळेकर यांच्या नावावर आहे. त्यांनी 37 वर्ष 231 दिवस वय होते तेव्हा शेवटची टेस्ट मॅच खेळली होती. साहाला पहिल्या बॅटींगनं काही कमाल करता आली नाही. तो फक्त 1 रन काढून आऊट झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Team india