Home /News /mumbai /

क्रूझ ड्रग्ज पार्टीच्या कारवाईत नवा ट्विस्ट, नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

क्रूझ ड्रग्ज पार्टीच्या कारवाईत नवा ट्विस्ट, नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली.

    मुंबई, 06 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मलिक यांनी पत्रकार परिषदेत काही गौप्यस्फोट केले आहेत. शनिवारी एनआयसीबी (NCB) नं CISFकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर (Cruise Ship) छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूडचा स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना अटक केली. एनसीबीनं केलेल्या या कारवाईसंदर्भात मलिक यांनी पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवून गौप्यस्फोट केलेत. सुरुवातीला नवाब मलिक म्हणाले की, 3 ऑक्टोबरला एका क्रूझवर रेड मारत एका मेगस्टरच्या मुलाला अटक करण्यात आली. या कारवाईचे व्हिडिओ ANI नं रिलीज केले. या व्हिडिओत अटक केलेल्यांना घेऊन जात असतानाच दाखवण्यात आलं आहे. यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत टक्कल असलेला एक व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात आहे. आणि याच व्यक्तीसोबत आर्यन खानचा एक सेल्फी फोटो आहे. त्यानंतर एएनआयनं दिल्लीतल्या एका अधिकाऱ्याच्या माहितीच्या आधारावर माहिती दिली की, NCB नं सांगितलं की हा व्यक्ती आमचा अधिकारी नाही. हेही वाचा- IPL 2021: धोनीच्या आयपीएल निवृत्तीबाबतची मोठी बातमी! CSK मॅनेजमेंटनं केला खुलासा  त्यानंतर मलिक यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. पुढे मलिक म्हणाले की, अरबाज मर्चंटचा देखील एक व्हिडिओ एएनआयनं रिलीज केला. यात लाल शर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे. हे दोन्ही फीड एएनआयनं रिलीज केलेत. या व्हिडिओत पहिला व्यक्ती के. पी. गोसावी आणि दुसरा व्यक्ती मनीष भानुशाली आहे. हे सांगताना मलिकांनी मोठा खुलासा केला आहे. या व्यक्ती भाजपचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा आणि आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळे मलिकांनी काही सवाल उपस्थित केलेत. एनसीबी आणि भाजपचे काय संबंध आहेत हे एनसीबीनं सिद्ध करावं, असं मलिकांनी म्हटलं आहे. हेही वाचा- क्रूझ ड्रग्स प्रकरणी आणखी 4 जण अटकेत, आरोपींचा आकडा 16 वर  के.पी. गोसावीचा एनसीबीसोबत नेमका काय संबंध आहे हे सांगावं? जर हे एनसीबीचे अधिकारी नाही आहेत तर दोन हायप्रोफाईल आरोपींना नेण्याचं काम यांनी कसं केलं? प्रायव्हेट लोकांना हायर करण्याचे अधिकारी NCB ला आहेत का? असे सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केले असून भानुशाली आणि गोसावीचे प्रोफाईल लॉक झाले असल्याचंही मलिकांनी सांगितलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai, Nawab malik, NCB, NCP

    पुढील बातम्या