मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Cordelia क्रूझ ड्रग्स प्रकरणात आरोपींचा संख्या 16 वर, दिल्लीचे 4 जण अटकेत

Cordelia क्रूझ ड्रग्स प्रकरणात आरोपींचा संख्या 16 वर, दिल्लीचे 4 जण अटकेत

मंगळवारी क्रूझवर ड्रग्ज पार्टीच्या संदर्भात आणखी चार लोकांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी क्रूझवर ड्रग्ज पार्टीच्या संदर्भात आणखी चार लोकांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी क्रूझवर ड्रग्ज पार्टीच्या संदर्भात आणखी चार लोकांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 06 ऑक्टोबर: Mumbai Cruise Drugs Case: शनिवारी रात्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या टीमनं छापा टाकून ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. आता या कारवाई संदर्भात नवी अपडेट समोर येत आहे. मंगळवारी क्रूझवर ड्रग्ज पार्टीच्या संदर्भात आणखी चार लोकांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर त्यानंतर या हायप्रोफाईल प्रकरणात अडकलेल्या लोकांची संख्या आता 16 झाली आहे. या अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे.

शनिवारी एनआयसीबी (NCB) नं CISFकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर (Cruise Ship) छापा टाकला होता. ही आलिशान क्रूझ तीन दिवसांच्या प्रवासाला निघाली होती. त्या क्रूझवर एकूण 1800 पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ज्यात बॉलिवूड, फॅशन आणि बिझनेस क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते.

हेही वाचा- IPL मध्ये संधी देतो सांगून तरुण खेळाडूंकडून लाखो रुपये उकळले, बड्या नावांचा प्रकरणात सहभाग

एनसीबीनं मंगळवारी 4 जणांना अटक केली. हे चार लोक त्या मिड सी रेव्ह पार्टीचे आयोजक आहेत. अटक करण्यात आलेली सर्व चारही जण दिल्लीचे आहेत. ज्याच्या कंपनीचे नाव Namascray असं आहे. असा आरोप आहे की, याच कंपनीनं क्रूझवर त्या रेव्ह पार्टीचे आयोजन केलं होतं.

एनसीबी मुंबईचे प्रमुख समीर वानखेडे यांनी सांगितलं की, मंगळवारी आम्ही 4 आयोजकांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक करण्यात आली आहे. आमचा तपास सुरू आहे.

सोमवारीही एनसीबीची धडक कारवाई

सोमवारी सकाळी कॉर्डेलिया क्रूझवर ( Cordelia Empress Cruise)आज पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं पथकानं धाड टाकली. सकाळी क्रूझची पुन्हा एकदा तपासणी झाली. स्वतः एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी ही धाड टाकली होती. या धाडीत काही प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कारवाईत ड्रग पेडलर्संना देखील ताब्यात घेतल्याचं समजतंय.

हेही वाचा- अकोल्यात भाजपला मोठा Shock, वंचितची सत्ता कायम; सर्व जागांचे निकाल जाहीर

शनिवारी एनसीबीने मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर ( CRUISE SHIP) सुरू असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. NCB नं प्रवासी म्हणून मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लक्झरी क्रूझ Cordelia मध्ये जाऊन सीक्रेट ऑपरेशन केलं.

7 तारखेपर्यंत आर्यन खान कस्टडीमध्ये

एनसीबीनं या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Bollywood actor Shah Rukh Khan's son) आठ जणांना रविवारी अटक करण्यात आली. आर्यन खानला (Aryan Khan) अटक केल्यानंतर त्याला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर आर्यनसह इतर सात आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. एनसीबीनं 13 ऑक्टोबर पर्यंत आर्यनची कस्टडी मागितली होती. मात्र आता कोर्टाने 7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबीला आर्यनची कस्टडी दिली. आर्यन खानसह अन्य तीन आरोपींना सात ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली.

हा कोड वर्ड वापरुन आयोजित केलेली क्रुझवरील ड्रग्स पार्टी

NCB ला तीन दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती मिळाली होती. कोड वर्ड वापरुन ही पार्टी आयोजित केली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा- IPL 2021: CSK च्या ऋतुराज गायकवाडमुळे अभिनेत्री सायली संजीव चर्चेत, पाहा काय आहे कनेक्शन 

काय घडलं होतं नेमकं?

एनसीबीच्या पथकाने मुंबईतील समुद्रात Cordelia या क्रुझरवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला करण्यात आला अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने छापा मारला. या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्स, एमडी ड्रग्स जप्त केले. एनसीबीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्यांदाच एखाद्या क्रुझवर NCB च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या क्रुझवर एक फॅशन शो सुरू होता. त्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्ती आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या क्रुझवर हजर होते. NCB ने ही ड्रग्स पार्टी उधळून लावली. NCB चे पथक मागील 20 दिवसांपासून या क्रुझवर नजर ठेवून होते.

First published:

Tags: Mumbai, NCB