मुंबई, 6 नोव्हेंबर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai Cruise drug party case) आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता यात नवा ट्विस्ट आला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित भारतीय (BJP Mohit Bhartiya) यांनी पत्रकार परिषद घेत ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या संदर्भात फोटो, ऑडिओ क्लिप दाखवत गंभीर आरोप केला आहे. या सर्व प्रकरणात सुनील पाटील (Sunil Patil) नावाचा व्यक्ती मास्टरमाईंड असल्याचा आरोप मोहित भारतीय यांनी केला आहे.
मोहित भारतीय म्हणाले, गेल्या महिन्यापासून एक प्रकरण गाजत आहे. ते म्हणजे आर्यन खान प्रकरण… दोन तारखेला अटक झाली आणि 3 तारखेला त्याला रिमांड मिळाला. त्यानंतर 6 तारखेला पत्रकार परिषद घेऊन एका मंत्र्याने भाजप, एनसीबीवर आरोप केले. या सर्वांच्या मागची कहाणी मी पुराव्यांसह सादर करत आहे. या सर्व गोष्टींचा मास्टरमाईंड सुनिल पाटील आहे. हा सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे असा दावाही मोहित भारतीय यांनी केला आहे.
BIGGEST EXPOSE in the history of Maharashtra in this Press Conference प्रेस वार्ता: महाराष्ट्र के इतिहास का सबसे बड़ा खुलासा https://t.co/avVBCnutBn
— Mohit Bharatiya ( Mohit Kamboj ) (@mohitbharatiya_) November 6, 2021
वाचा : आर्यन खान प्रकरणातून समीर वानखेडेंना हटवलं, नवाब मलिक म्हणाले...
20 वर्षांपासून सुनील पाटील एनसीपीच्या संपर्कात
सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस आहे आणि तो गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे. सुनील पाटील हा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याचा जिगरी मित्र आहे. सुनील पाटील हा बदल्यांचं रॅकेट चालवत होता. सुनील पाटील याचे महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांसोबत जवळचे संबंध असल्याचाही गंभीर आरोप मोहित भारतीय यांनी केला आहे.
किरण गोसावी हा सुनील पाटील यांचा माणूस
मोहित भारतीय यांनी पुढे म्हटलं, किरण गोसावी हा सुनील पाटील यांचा माणूस आहे. सुनील पाटील यांनी किरण गोसावींचा नंबर सॅम डिसूझाला दिला होता. इथे हा प्रश्न निर्माण होत आहे की एनसीपीने सुनील पाटीलला पुढे करत हे का केले, कोण मंत्री आहे जे हे सगळे करत आहेत. खूप सिनियर लिडर आहे, मी त्यांच्यावर आरोप लावत नाही पण त्यांना हे सांगावे लागले की, त्यांच्या लोकांचे, मंत्र्यांचे पक्षाचे या व्यक्तींशी काय संबंध आहे.
वाचा : आर्यन खान प्रकरण काढून घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
ऋषिकेश देशमुख हॅाटेल ललितमध्ये वर्षभर काय करत होते?
किरण गोसावी हा सुनील पाटीलचा माणूस आहे, जो किरण गोसावीसेबत सगळी कामं करत होता. तो कोणत्याही पक्षाच्या नेत्यांबरोबर फोटो काढून ते लोकांना दाखवत असे. ड्रग्ज प्रकरणात एका अधिकाऱ्याचा ज्याच्या संबंध नाही... त्याच्या नावावर पैसे मागितले गेले. सगळी माणसे सुनील पाटीलचे आहेत. मी एक ॲाडिओ दाखवेल ज्यात शाहरूखच्या मुलाला सोडवण्यासाठी तोडपाणी करण्यासाठी पुढे येत होते. ऋषिकेश देशमुख हॅाटेल ललितमध्ये वर्षभर काय करत होते. महाराष्ट्रात ड्रग्ज वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे का? असा सवालही मोहित भारतीय यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.