मुंबई, 05 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानला अटक (Aryan Khan arrest case) करणे NCB चे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांना चांगलेच भोवले आहे. समीर वानखेडे यांच्यासह एकूण 6 प्रकरणं काढून घेण्यात आली आहे. तर, 'माझी बदली झालेली नाहीये, मी अद्याप झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. फक्त ही 6 प्रकरण दिल्लीच्या टीमकडे दिली आहे, असा खुलासा समीर वानखेडेंनी केला आहे.
आर्यन खान अटक प्रकरणामुळे एनसीबीला अनेक गंभीर आरोपांना सामोरं जावं लागलं. त्यानंतर एनसीबीने या प्रकरणी पहिल्यांदाच मोठे पाऊल उचलले आहे. आर्यन खान प्रकरण समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आले पण आणखी 6 प्रकरणं काढली आहे. या कारवाईनंतर समीर वानखेडेंनी आपली भूमिका मांडली.
'माझी बदली झालेली नाहीये, मी अद्याप झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. बदलीच्या फक्त अफवा आहेत फक्त 6 केसेस दिल्लीतील टिमकडे देण्यात आल्यात. आर्यन खान, समीर खान यांच्या केसचा तपास त्या टीमकडून होणार आहे. आयपीएस संजय सिंह यांच्या नेतृत्वात तपास होणार आहे, अशी माहितीही समीर वानखेडेंनी दिली.
Mumbai | Total 6 cases of our zone will now be investigated by Delhi teams (of NCB), including Aryan Khan's case and 5 other cases. It was an administrative decision: Mutha Ashok Jain, Deputy DG, South-Western Region, NCB
(File photo) pic.twitter.com/vmjP65YOOv — ANI (@ANI) November 5, 2021
तसंच, 'मी मुंबईतच झोनल डायरेक्टर म्हणून कायम आहे. आर्यन खान, समीर खान आणि इतर 4 केसेस च्या तपासासाठी एनसीबी दिल्लीने एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. मी माझ्या याचिकेत म्हटलं होतं की, या दोन केसेस कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपास केल्या जाव्यात' असंही वानखेडे म्हणाले.
दरम्यान,एनसीबीने या प्रकरणी पहिल्यांदाच मोठे पाऊल उचलले आहे. आर्यन खान प्रकरण समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आले पण आणखी 6 प्रकरणं काढली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या आदेशात डीजी एनसीबीने मुंबई झोनल युनिटमधून 6 प्रकरणे सेंट्रल युनिटकडे हस्तांतरित केली. ही पाच प्रकरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत आणि जिथे आंतरराज्यीय संबंध गुंतलेले आहेत. आर्यन खान, समीर खान या प्रकरणासह अरमान कोहली, इकबाल कासकर, कश्मीर ड्रग्स प्रकरणासह एकूण 6 प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबी करणार आहे.
अरमान खान आणि आर्यन खान सारखी ही काही बॉलिवूड प्रकरणे आहेत. आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय सिंह या प्रकरणाचा तपास पाहणार आहे. संजय सिंग एनसीबीमध्ये डीडीजी ऑपरेशन्स आहेत. ही संवेदनशील प्रकरणे हलवण्यात आली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण नव्याने तपास पुराव्यानिशी केला जाणार असल्याची माहितीसमोर आली आहे.
पॉर्नस्टार मिया खलिफा घेते `ही` विशेष ट्रिटमेंट
सेंट्रल युनिट मॉनिटरिंगमुळे आर्यन खानसारख्या हायप्रोफाईल प्रकरणांबद्दलचा अनावश्यक वाद टाळता येईल, अशी भूमिका एनसीबीने घेतली आहे. या प्रकरणातून समीर वानखेडे यांना हटवण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा टेकओव्हर चौकशीसाठी संजय सिंह उद्या टीमसह मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.