मनसेचं नवं पोस्टर, राज ठाकरे करणार नव्या वादळाची सुरुवात

मनसेचं नवं पोस्टर, राज ठाकरे करणार नव्या वादळाची सुरुवात

सततच्या अपयशाला दूर सारण्यासाठी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

  • Share this:

मुंबई 18 जानेवारी : मनसेचं नवं अधिवेशन येत्या 23 तारखेला मुंबईत होणार असून त्यात मनसे कात टाकणार आहे. तब्बल 1 लाख कार्यकर्ते या मेळाव्याला येणार असल्याचा दावा मनसेकडून केला जातोय. या मेळाव्यात राज ठाकरे हे पक्षाचा नवा झेंडा जाहीर करणार आहेत. या मेळाव्याचं नवं पोस्टर प्रकाशित करण्यात आलंय. पोस्टरवर भगव्या रंगात महाराष्ट्राचा नकाशा दाखविण्यात आलाय. आधिचा पंचरंगी झेंडा पोस्टरवरुन गायब झालाय. राज ठाकरेंची महाराष्ट्रधर्माची भूमिका असणार असल्याचं स्पष्ट झालंय. सततच्या अपयशाला दूर सारण्यासाठी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचं नवं धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी 'शिवराजमुद्रा' असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचं म्हटलं जातंय.

अबब...व्यापाऱ्यांची बनवेगीरी, GST अधिकाऱ्यांनी जप्त केले 25 कोटींचे हिरे

राज्यात बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनाला आपली कडवी भूमिका थोडी मवाळ करावी लागली होती. त्यामुळे शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी मनसे नवी भूमिका स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान मनसेच्या या नव्या भगवीकरणावर पुण्याच्या शिवसैनिकांनी चक्क स्वागत केलंय. काहीनी तर चक्क मनसेला सेनेत विलीन करण्याचा सल्ला दिला.  पण हे सांगतानाच शिवसेनेचं हिंदुत्व अद्यापही कडवटच असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.

मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली, चंद्रकांत पाटील यांची कबुली

23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यादिवशी मनसेचं महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देण्यावर कार्यकर्त्यांना उभारी देणार आहे. याच दिवशी आता राज ठाकरे मराठ अस्मितेसोबतच हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहेत.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2020 09:25 PM IST

ताज्या बातम्या