मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली, चंद्रकांत पाटील यांची कबुली

मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली, चंद्रकांत पाटील यांची कबुली

पण हा असा कालावधी मिळालाय ज्यात कोण आपला आहे, कोण सत्तेसाठी आला होता. हे तपासायचे आहे.

पण हा असा कालावधी मिळालाय ज्यात कोण आपला आहे, कोण सत्तेसाठी आला होता. हे तपासायचे आहे.

पण हा असा कालावधी मिळालाय ज्यात कोण आपला आहे, कोण सत्तेसाठी आला होता. हे तपासायचे आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar
पुणे 18 जानेवारी : विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपच्या मेगाभरतीमुळे सगळ्याच राजकीय पक्षांना हादरे बसले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक दिग्गज नेते हे भाजपमध्ये आल्याने भाजपची ताकद वाढली असंही म्हटलं गेलं. शक्तीसंचय करण्यासाठी असे नेते पक्षात घ्यावे लागतात असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन या सगळ्या मेगाभरतीचे सूत्रधार होते. पण निकालानंतर जे चित्र पुढे आलं त्यामुळे ही मेगाभरती भाजपला फायद्याची ठरली नाही हे सिद्ध झालंय. याची कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. त्यांच्या या विधानामुळे भाजपमध्येही त्याबाबतीत असंतोष आहे हे स्पष्ट झालंय. पिंपरी-चिंचवड इथं झालेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती थोडी बिघडली. भाजपची संस्कृती अशी नव्हती. हा पक्ष प्रेमावर चालतो. पण थोडा बदल झाला. जो काम करतो त्याला नाही तर तो आपल्या जवळ आहे त्याला पदं दिली गेलीत. हे कल्चर आता उद्धवस्त करावं लागणार आहे.

अवधूत गुप्तेंच्या ‘पटानी’ गुगलीवर आदित्य ठाकरे 'क्लिन बोल्ड'

ते पुढे म्हणाले, सरकार गेल्या पासून मी गमतीने म्हणतो. मला एक स्वप्न पडले. पडलं नव्हतं पण मी तसं म्हणतो. त्या स्वप्नात परमेश्वर आले आणि ते म्हणाले योजना म्हणून मी हे सरकार काही महिन्यांसाठी घालवले. या महिन्यांत माणसं जरा चेक करू घ्या. तेवढ्यात मला जाग आली, नाहीतर मी विचारणार होतो. किती महिने वाट बघू. ते अस्पष्ट राहिलं. त्यासाठी पुन्हा स्वप्न पडावे लागेल. पण हा असा कालावधी मिळालाय ज्यात कोण आपला आहे, कोण सत्तेसाठी आला होता. हे तपासायचे आहे. हेच या संघटनेचे बेसिक तत्वज्ञान आहे.
First published:

पुढील बातम्या