मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अबब...व्यापाऱ्यांची बनवेगीरी, GST अधिकाऱ्यांनी जप्त केले 25 कोटींचे हिरे

अबब...व्यापाऱ्यांची बनवेगीरी, GST अधिकाऱ्यांनी जप्त केले 25 कोटींचे हिरे

 कर चुकविण्यासाठी मुंबईतल्या काही हिरे व्यापाऱ्यांनी एक शक्कल लढवली होती. या करबुडव्यांचा छडा लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली आणि नेमकी विश्वसनीय माहिती मिळवली.

  • Published by:  Ajay Kautikwar
विवेक गुप्ता, मुंबई 18 जानेवारी : मुबंईत हिरे व्यापाऱ्यांची बनवेगीरी उघड झालीय. GSTच्या अधिकाऱ्यांनी कर चुकवणाऱ्या अशा बड्या धेंडांचा पदार्फाश केलाय. या व्यापाऱ्यांकडून तब्बल 25 कोटींचे हिरे, दागिणे आणि सोनं जप्त करण्यात आलंय. कर चुकवेगीरी करणाऱ्या व्यापाऱ्यांची एक मोठी टोळीच असल्याचं उघड झालं असून असे 70 अधिकारी रडावर आले आहेत. या कारवाईमुळे GST बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांचं सर्वात मोठं रॅकेट उघड झालंय. अतिशय चलाखी करून हे व्यापारी मौल्यवान दागिण्यांचा व्यवहार करत होते. देशात GST लागू झाल्यानंतर कररचना सुटसुटीत झाली. अनेक कर रद्द होऊन फक्त काहीच कर ठेवले गेले. त्यामुळे काही गोष्टी महाग झाल्यात तर काही स्वस्त. इतर वस्तुंच्या तुलनेत हिरे, सोनं, चांदी या गोष्टींवर जास्त GST आहे. त्यामुळे हा कर चुकविण्यासाठी मुंबईतल्या काही हिरे व्यापाऱ्यांनी एक शक्कल लढवली होती. हवाई मार्गाने ते हिरे आणि सोन्याची ने आण करत होते. त्याचबरोबर त्याची बिलं दाखवली जात नव्हती. असं काम सुरू असल्याची गुप्त माहिती GST अधिकाऱ्यांना मिळाली होती. फडणवीसांचे विश्वासू आमदार अजित पवारांच्या भेटीला, चर्चेला उधाण कर चुकविणाऱ्या या करबुडव्यांचा छडा लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली आणि नेमकी विश्वसनीय माहिती मिळवली. त्यानंतर सुरू झाली खास ऑपरेशनची तयारी. हे व्यापारी नेमकं कुठे जातात, काय आणतात, काय करतात त्याची माहिती काढली गेली आणि नेमकी वेळ धरून छापे घातले गेले. यात या व्यापाऱ्यांची बनवेगीरी उघड झाली.

अजित पवारांचा धडाका सुरूच, पहिल्याच बैठकीत बदललं 'पुणे मेट्रो'चं नाव

या व्यापाऱ्यांकडून जे जप्त झालं त्यामुळे अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले. तब्बल 25 कोटींचा माल जप्त करण्यात आलाय. अशी करबुडवेगीरी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची तरतूद GSTच्या नियमांमध्ये आहे.
First published:

पुढील बातम्या