बंडखोर नेत्यांचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुरुवारी गोव्यातून मुंबईत दाखल झाले. त्यांनी फडणवीसांसोबत राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. या घोषणेनंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण ठाकरे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज बांधला जात होता. पण फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. दोन तासांमध्ये नेमकं काय झालं? फडणवीस उपमुख्यमंत्री व्हायला कसे तयार झाले, Inside Story एकनाथ शिंदे यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर तिकडे गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेले शिवसेनेचे इतर बंडखोर नेते यांचा आनंदाचा पारा राहिला नाही. त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रचंड जल्लोष केला. शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आनंद गगनात राहिला नाही. आमदार अक्षरश: टेबलवर चढून नाचत होते. हे सर्व नेते 'नाथांचा नाथ एकनाथ' या गाण्यावर नाचताना दिसले. यानंतर एकनाथ शिंदे गोव्यात पोहोचताच आमदारांनी अतिशय जल्लोषात त्यांचं स्वागत केलं.एकनाथ शिंदे रात्री उशिरा गोवा येथील ताज हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी शिवसेना आणि अपक्ष समर्थक आमदारांच्यावतीने त्यांचं गोव्यात जंगी स्वागत करण्यात आलं pic.twitter.com/tlIkYZutrS
— News18Lokmat (@News18lokmat) July 1, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, New cm