कल्याण, 22 मे: राज्यात लॉकडाऊनच्या काळात सर्व सामान्य जनतेला पोट भरण्याासाठी पैसा नाही. मात्र, कोव्हिड19 टेस्ट अर्थात कोरोनाची चाचणी करण्यासाठी सरकारने नवा बिझिनेस सुरु केला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने (केडीएमसी) कोव्हिड टेस्टिंगसाठी प्रति रुग्णाकडून तीन हजार रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे राज्य सरकार व महापालिकेने आरोग्य सेवेच्या नावाखाली बिझनेस सुरु केला आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. हेही वाचा… आधी म्हणायचं ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’, आता काढत आहे ‘महाराष्ट्र बचाव’चे गळे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलं की, रेशन कार्डचा रंग पाहून उपचारासाठी रुग्णांकडून पैसे वसूल केले जात आहेत. आता तर प्रत्येक टेस्टिंगचे तीन हजार रुपये घेण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांकडे पोट भरण्यालाठी पैसा नाही. हाताला काम नसल्याने त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. लोक गरजूंना मदत करीत आहे. त्यात केडीएमसीने तर कहर केला आहे. टेस्टिंगचे पैसे घेणे सुरु केले आहे. केडीएमसीच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातही कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असतानाच राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे सरकार कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपने शुक्रवारी ‘महाराष्ट्र वाचवा’ आंदोलन सुरु केलं आहे. राज्याच्या विविध ठिकाणी या भाजपचं आंदोलन सुरू आहे. अंगण हेच रणागंण असं म्हणत अनेक बडे नेते आंदोलनात सामील झाले आहेत. काँग्रेसनं याला ‘भाजप बचाओ’ आंदोलन असं म्हटलं आहे. तर भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीनं महाराष्ट्रद्रोही भाजप असं आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्रद्रोही BJP हा ट्रेंड ट्विटरवर सुरु केला आहे. राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नसून केंद्राने दिलेला पैसा राज्य सरकार खर्च करायला तयार नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. ‘रुग्णालयात अॅडमिट होण्यासाठी फिरावं लागत आहे अशी परिस्थिती आहे. हेही वाचा.. Good News: पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी, गंभीर कोरोना रुग्ण झाला बरा बीकेसीला सेंटर तयार केलं जात आहे जे दोन दिवसांत भरून जाईल, पावसाळ्यात काय करणार? केंद्रानं सर्व प्रकारचं रेशन उपलब्ध करून दिलं आहे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही धान्य मिळण्याची तरतूद केली आहे, मात्र, राज्य सरकारने स्वतः काहीही केलेलं नाही’ अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







